Haryana Elections 2024 No alliance between AAP and Congress : भाजपाला टक्कर देण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. याचा इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीत फायदा झाला. हीच इंडिया आघाडी आगामी वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपाविरोधात मैदानात उतरेल अशी चर्चा आहे. मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये बिनसल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणात आम आदमी पार्टीने ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. आपने आज (सोमवर, ९ सप्टेंबर) दुपारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचे त्यांचे २० उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच आपने राज्यातील ५० जगा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले होते, हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम्ही आम आदमी पार्टीला बरोबर घेऊ. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या बैठका पार पडल्या. मात्र आपने मोठ्या मागण्या पुढे केल्या, ज्या काँग्रेसने अमान्य केल्या. आपने राज्यात विधानसभेच्या २० जागा मागितल्या होत्या. काँग्रेसने आपला इतक्या जागा देण्यास नकार दिल्यानंतर उभय पक्षांमधील बोलणी फिस्कटली. परिणामी आपने त्यांच्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
chandrababu naidu to resign from nda fact check
आंध्र प्रदेशात राजकीय भूकंप! चंद्राबाबू नायडूंनी सोडली एनडीएची साथ? व्हायरल Photo नेमका कधीचा? सत्य आलं समोर
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही? भुजबळांचं सूचक विधान; म्हणाले, “आमच्या ग्रुपचे कॅप्टन…”
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!
Sharad Pawar
Sharad Pawar : महायुती सरकार आल्याने काय बदल घडला? शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”

हे ही वाचा >> GST Council Meeting : कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार, फरसाणावरील जीएसटीत घट; केंद्र सरकारचे मोठे निर्णय

…अन् आप-काँग्रेसची बोलणी फिस्कटली

काँग्रेसने आपची मागणी फेटाळल्यानंतर आम आदमी पार्टी १० जागा मिळाव्यात यासाठी आग्रही होती. मात्र काँग्रेसने त्यांना केवळ तीन ते चार जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आपने नारजी जाहीर केली. अखेर आपने ‘एकला चलो रे’चा नारा देत त्यांची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आपने काँग्रेसकडे कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपतसारख्या जागा मागितल्या होत्या. या भागात आपने गेल्या काही वर्षांमध्ये हातपाय पसरले आहेत.

हे ही वाचा >> Amanatullah Khan : आप आमदार अमानतुल्लाह खान यांना वक्फ घोटाळा प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकीचं बळ दिसणार नाही?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपने हरियाणात युती केली होती. ज्याचा त्यांना फायदा झाला. राज्यातील लोकसभेच्या १० पैकी ९ जागा काँग्रेसने लढवल्या होत्या, तर आपने एक जागा लढवली होती. आपचा उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाला, मात्र काँग्रेसने ९ पैकी पाच जागा जिंकल्या. तर भाजपाने १० जागा लढवून त्यापैकी पाच जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचं एकीचं बळ पाहायला मिळालं. मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकीत ते दिसणार नाही.