Haryana – Jammu and Kashmir Exit Polls 2024 : हरियाणात आज ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असल्यामुळे निवडणूक पार पडली. आता ८ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. मात्र, यंदा काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. माजी कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदान संपल्यानंतर आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोल समोर येणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलची संबंध देशाला प्रतिक्षा लागली आहे. अखेर एक्झिट पोलचे आकडे काय असणार? यासाठी घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Haryana - Jammu and Kashmir Exit Polls Results 2024 Live

20:39 (IST) 5 Oct 2024
जम्मू-काश्मीरमध्येही भाजपाला धक्का, एक्झिट पोलनुसार किती जागा मिळणार?

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. इंडिया टुडे-सी व्होटर्स : इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या सर्वेनुसार काँग्रेस आणि एन.सी. आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पीडीपीला ६ ते १२, तर अपक्षांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज २४ चाणाक्य : न्यूज २४ चाणाक्यच्या एक्झिट पोलनुसार, भाजपा २३ ते २७ जागा, काँग्रेस-एन.सी. ४६ ते ५०, पीडीपी ७ ते ११ तसेच इतर ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ : टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी.आघाडीला ३१ तो ३६ जागा, पीडीपीला जागा ५ ते ७, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क : रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३१ ते ३६ जागा, पीडीपीला ५ ते ७ जागा, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

19:53 (IST) 5 Oct 2024
Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात कोणत्या एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा?

Haryana Exit Polls Results 2024 : पीमार्कच्या एक्झिट पोलनुसार, हरियाणात काँग्रेसला ५१-६१ जागा आणि भारतीय जनता पक्षाला २७-३५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पीपल्स पल्समध्ये काँग्रेसला ४९-६१ जागांवर तर भाजपा २० ते ३२ जागांवर आघाडीवर दाखवला आहे. तसेच एनडीटीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला ५५ आणि भाजपाला २५ जागा मिळू शकतात. तसेच इंडिया टीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला ४४-५४ जागा आणि भाजपाला १९ ते २९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

19:29 (IST) 5 Oct 2024
Jammu and Kashmir Exit Polls 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? काय सांगतात एक्झिट पोल?

Jammu and Kashmir Exit Polls 2024 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल एका दशकानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करत उस्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, आता ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोल समोर आले आहेत.

कोणत्या पक्षाला किती जागा?

इंडिया टुडे-सी व्होटर्स

भाजपा – २७ ते ३२ जागा

काँग्रेस-एन.सी.- ४० ते ४८ जागा

पीडीपी – ६ ते १२ जागा

इतर – ६ ते ११ जागा

सविस्तर वाचा

18:58 (IST) 5 Oct 2024
Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात कोणाची सत्ता येणार? एक्झिट पोल समोर

हरियाणा राज्यात आज (५ ऑक्टोबर) विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. ८ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल समोर येणार आहे. मात्र, त्याआधी आज एक्झिट पोल समोर आले आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती तर भाजपामधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले असून आता एक्झिट पोल समोर आले आहेत.

कोणत्या पक्षाला किती जागा?

न्यूज २४ चाणाक्य :

एनडीए : १९ ते २९

इंडिया आघाडी : ४४ ते ५४

इतर : ४ ते ९

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क

एनडीए - १८ ते २४

इंडिया आघाडी : ५५ ते ६२

इतर : २ ते ५

18:22 (IST) 5 Oct 2024
Jammu and Kashmir Exit Polls 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे एक्झिट पोल थोड्याच वेळात समोर येणार, जनेचा कौल कोणाला?

Jammu and Kashmir Exit Polls 2024 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल एका दशकानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करत उस्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोल समोर येणार आहेत. जम्मू-काश्मीरसह संबंध देशाला या एक्झिट पोलची प्रतिक्षा लागली आहे.

Haryana - Jammu and Kashmir Exit Polls Results 2024 Live: हरियाणात आज ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान झाले. यानंतर आज दोन्ही राज्यातील एक्झिट पोल थोड्याच वेळात समोर येणार आहेत.

Exit Polls Results 2024

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये मतदान पार पडले.