Haryana Results : हरियाणा निकालानंतर पंतप्रधान मोदींची बोचरी टीका, “काँग्रेसचा डबा गुल झाला आहे, पितळ उघडं पडलं आहे, आता..”

काँग्रेसने मागास, दलित यांच्यावर कायमच अन्याय केला अशीही टीका मोदी यांनी केली आहे.

PM Modi Slams Congress After Haryana Results
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका (फोटो-ANI)

Haryana Results : हरियाणा निवडणुकीत भाजपाला उत्तम यश मिळालं. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात भाषण करताना काँग्रेसला टोले लगावले आहेत. तसंच जम्मू काश्मीरच्या निकालाचाही मी सन्मान करतो असंही मोदी यांनी म्हटलं आहे. हरियाणातला विजय ( Haryana Results ) ऐतिहासिक आहे. या विजयाने आपल्याला खूप आनंद झाला आहे असं म्हणत असतानाच काँग्रेससाठी अनेक राज्यांनी नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेसचा डबा गुल झाला आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

हरियाणातल्या जनतेने तिसऱ्यांदा भाजपावर विश्वास ( Haryana Results ) टाकला आहे. तसंच आम्हाला भरभरुन मतदान केलं आहे. हरियाणातल्या जनतेने इतिहास ( Haryana Results ) रचला आहे. आपल्या देशात अनेक राज्यं अशी आहेत ज्यांनी कधीही काँग्रेसला सलग दोनदा सत्ता दिली नाही. पण भाजपावर तो विश्वास टाकला. हरियाणामध्ये भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता दिली. हरियाणात जेव्हापासून निवडणूक होऊ लागली तेव्हापासून हे पहिल्यांदाच घडतं आहे. काँग्रेससाठी अनेक राज्यांनी नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता भुलत नाही. आधी त्यांना वाटायचं की काहीही केलं नाही तरीही आपली सत्ता येईल. पण आता तशी स्थिती नाही. लोकांनी काँग्रेसला नाकारलं आहे.

हे पण वाचा- Haryana JJP Loss : हरियाणात भाजपाचा विजय पण JJP चं नुकसान, छोट्या पक्षांचं नेमकं काय झालं?

कांँग्रेसचा डबा गुल झाला आहे

काँग्रेसचा डबा गुल झाला आहे, तसंच त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. काँग्रेस सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार मानते. सत्ता नसेल तर काँग्रेसची अवस्था ही जल बिन मछली सारखी म्हणजेच पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशासारखी होते. त्यामुळे ते सत्तेत ( Haryana Results ) आल्यानंतर देशाला, समाजाला पणाला लावतात. त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. आज संपूर्ण देश पाहतो आहे की काँग्रेस आपल्या समाजात जातीभेदाचं विष कालवते आहे. जे लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले, फाईव्ह स्टार आयुष्य पिढ्या न पिढ्या जगत आहेत ते आता गरीबांना जातीच्या नावावर लढवू पाहात आहेत. आपल्या दलित, आदिवासी आणि मागासवर्गाने हे मुळीच विसरु नये.

काँग्रेसने दलित, मागास यांच्यावर सर्वाधिक अन्याय केले

काँग्रेसने दलित, मागास यांच्यावर सर्वाधिक अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे. काँग्रेसने इतक्या दशकांपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा यांपासून वंचित ठेवलं. १०० वर्षांनी सत्ता मिळाली तरीही दलित किंवा मागास माणसाला हे पंतप्रधान होऊ देणार नाहीत हा यांचा खरा चेहरा आहे. काँग्रेसचं कुटुंब दलित, आदिवासी आणि मागास वर्ग यांचा तिरस्कार करतं. त्यामुळेच हे लोक पुढे गेले तर त्यांच्या पोटात दुखू लागतं. हरियाणातही यांनी हेच केलं. दलित, मागास वर्गातल्या लोकांचा अपमान केला. काँग्रेसच्या शाही कुटुंबाने सांगितलं आम्ही आरक्षण संपवणार. दलित आणि मागासवर्ग यांचं आरक्षण हिसकावून ते त्यांच्या व्होट बँकेला देणार होते. हरियाणात हेच घडवायचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. काँग्रेस भारताच्या समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांना अराजक पसरवायचं आहे असाही आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. शेतकऱ्यांना भडकवण्याचाही प्रयत्न हरियाणात करण्यात आला. पण हरियाणातील शेतकऱ्यांनी त्यांना करारा जवाब दिला आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Haryana results pm narendra modi slams congress allegations on its divide policy scj

First published on: 08-10-2024 at 21:00 IST

संबंधित बातम्या