Hasan Mushrif Kagal Speech on deputy CM of Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे पक्ष निवडणुकीला सामोरे जात असले तरी महायुती किंवा मविआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. महायुतीने म्हटलं आहे की “आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत”. तर, मविआ नेत्यांनी म्हटलं आहे की “निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदासाठीचा नेता ठरवू. मविआमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जावं यासाठी प्रचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला, भाजपा व शिवसेनेने (शिंदे) सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत मौन बाळगलं आहे.

दरम्यान, अजित पवारांचा पक्ष दोन-दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पक्षातील वरिष्ठ नेते हसन मुश्रीफांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे.

maharashtra poll 2024 ubt chief uddhav thackeray finally managed to convince sudhir salvi
शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा
Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
हसन मुश्रीफ – समरजीत घाटगे यांच्यातील वादाने टोक गाठले
Jayant Patil Statement About CM Post
Jayant Patil : “मुख्यमंत्री व्हायचं असेल तर खूप उठा-बशा..”, जयंत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत
ramraje naik nimbalkar ajit pawar (1)
अजित पवारांना मोठा धक्का, रामराजे नाईक निंबाळकरांनी मार्ग बदलला; म्हणाले, “इथून पुढे मी…”
Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke
Sujay Vikhe Patil : नगरमध्ये राजकारण तापलं, सुजय विखेंचा निलेश लंकेंना इशारा; म्हणाले, “टायगर अभी…”
What Pankaja Munde Said About Harshvardhan Patil?
Pankaja Munde : “हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा पक्ष सोडायला नको होता, पण…”; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

हे ही वाचा >> Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड शरद पवार गटातील नेत्याशी भिडले, माध्यमांसमोर हमरीतुमरी; अंतर्गत वाद चव्हाट्यावर, VIDEO व्हायरल

हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य

“महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होईन”, असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कागलमधील एका प्रचारसभेत बोलत असताना मुश्रीफांनी हे वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा कागलमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, स्वतःचा प्रचार करत असताना कागलमध्ये आयोजित एका प्रचारस्भेत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.

मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

हसन मुश्रीफ म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी होऊन आपली राज्यात सत्ता येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनी तसं ठरवलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार आणायचं असं त्यांनी ठरवलं आहे. राज्यात पुन्हा एकदा आमची सत्ता आली तर याहीपेक्षा अधिक चांगलं खातं मला मिळेल की नाही?”

हे ही वाचा >> भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; घाटकोपर, बोरीवली, वर्सोव्याचा समावेश!

राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळणार?

मुश्रीफांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री… हसन मुश्रीफ…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना थांबवलं. ते म्हणाले, “नाही, मुख्यमंत्री नाही होणार, झालो तर मी उपमुख्यमंत्री होऊ शकेन. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, काही ठिकाणी तीन, मग आपल्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत”.