Heena Gavit Resigns from BJP ahead of Maharashtra Assembly Election 2024 : माजी खासदार हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा व पक्षातील सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. हिना गावित या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या देखील होत्या. लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर डॉ. हिना गावित यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज (अपक्ष) दाखल केला आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षश्रेष्ठी त्यामध्ये अपयशी ठरले आहेत. त्यानंतर आता गावितांनी भाजपाला रामराम केला आहे. हिना गावित या मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघात भाजपा व महायुतीविरोधात बंडखोरी केली आहे.

महायुतीत अक्कलकुवा हा मतदारसंघ भाजपाला मिळावा व भाजपाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी हिना गावित यांची इच्छा होती. मात्र, तसं होऊ शकलं नाही. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत अक्कलकुवा मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे) वाट्याला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथून विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या हिना गावितांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी पक्षालाही रामराम केला आहे.

maharashtra assembly election 2024 eknath shinde cheated me says palghar mla srinivas vanga
एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
In Thane CM Eknath Shinde stated Mahayutis strong performance will stem from work and development
महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Eknath Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
Eknath shinde
शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते
CM Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…

हे ही वाचा >> ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका

हिना गावितांच्या बंडखोरीचं कारण काय? स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाल्या…

दरम्यान, भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर हिना गावित यांनी पुढारी वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “मी नंदुरबारमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. चार महिन्यांपूर्वी जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा एकदा मला उमेदवारी दिली होती. मी येथून लोकसभेची निवडणूक लढवत होते. परंतु, माझ्या मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्या निवडणुकीत जाहीरपणे काँग्रेसचा प्रचार केला. त्यानंतर येथून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. असं असूनही त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना थांबवलं नाही. आता अक्कलकुवा मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे) नेत्याला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आम्ही शिवसेनेचा (शिंदे) प्रचार करणार नाही. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मी इथून निवडणूक लढवत आहे. या सर्व बाबी मी माझ्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात नमूद केल्या आहेत”.