Kasba Assembly Election Result Live Updates: विधानसभा निवडणूक २०२४चा निकाल जाहीर होत आहे. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भाजपने पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झालेला वचपा विधानसभा निवडणुकीत काढला आहे. याठिकाणी भाजपचे हेमंत रासने यांनी मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने यांनी पराभव केला आहे. गेल्या पंचवीस वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता. आता पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यास हेमंत रासने यांना मोठे यश आले आहे.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ हा स्फोटक म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानता होता. भाजपचं इथे वर्चस्व होतं. १९९५ ते २०१९ पर्यंत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र २०२३ मध्ये भाजपच्या मुक्ता टिळत यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. आता विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यंदाही विधानसभेच्या रिंगणात होते मात्र आता समोर आलेल्या निकालानुसार कसब्यातून हेमंत रासने विजयी झाले आहेत तर रवींद्र धंगेकर यांचा पराभूत झाला आहे.

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Pankaja Munde And Devedra Fadnavis Meeting At Mumbai.
Devendra Fadnavis : मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन, “खास…”

दरम्यान विजयी झाल्यानंतर हेमंत रासने यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एकच जल्लोष केला. यावेळी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “३५ वर्ष ज्या बाप्पाची सेवा करतोय त्या बाप्पानं मला श्रद्धा आणि सबुरी शिकवलेली आहे. मागच्यावेळी अपयश आलं पण अपयशातून यशाची मोठी पायरी चढली जाते. ज्या दिवशी परभूत झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून जनतेच्या सेवेसाठी उतरलो, ५० हजार जनतेची आम्ही कामं केली, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.”

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

काही दिवसांपूर्वी कसबा मतदारसंघात भाजपाच्या हेमंत रासने यांच्यासाठी आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “आपल्याला माहीत आहे काही दिवसांपूर्वी ‘ॲक्सिडेंटल पीएम’ चित्रपट आला होता. तसाच या कसब्यातही मागच्या निवडणुकीत एक ‘ॲक्सिडेंटल आमदार’ तयार झाला. हा आमदार काम कमी आणि दंगे आणि नाटकंच जास्त करतो. मला वाटते या आमदाराला जर रंगभूमीवर नेले असते तर त्याने ‘तो मी नव्हेच’ हे पात्र छान केले असते.”

Story img Loader