Himachal Pradesh Exit Polls Updates, 8 December 2022 : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होत. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या.

Live Updates

Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live Counting Updates : हिमाचल प्रदेशमध्ये कोणाची सत्ता? भाजपाने गड राखला की काँग्रेसने मारली बाजी? जाणून घ्या संपूर्ण निकाल एका क्लिकवर

20:14 (IST) 8 Dec 2022
काँग्रेसचा सर्वाधिक ४० जागांसह दणदणीत विजय

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक ४० जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपाची सत्ता खालसा झाली असून, २५ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत.

18:18 (IST) 8 Dec 2022
"मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशची निवडणूक हा..."

"काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशची निवडणूक हा पहिला विजय आहे. तेथील जनतेने पुन्हा काँग्रेसवर विश्वास टाकला आहे. मात्र, भाजपाची अलिकडील राजकारण पाहून घोडे बाजाराची शक्यता नाकारता येणार नाही," अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली.

17:54 (IST) 8 Dec 2022
काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या काँग्रेसचा ३९ जागांवर विजय झाला आहे. तर भाजपाला फक्त १८ जागांवर विजय मिळवता आला आहे. तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. तर अद्याप ८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. यामध्ये सात जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

16:24 (IST) 8 Dec 2022
काँग्रेस विजयाच्या जवळ, आतापर्यंत २९ जागांवर विजय

काँग्रेस पक्ष हिमाचल प्रदेशमध्ये विजयाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. आतापर्यंत या पक्षाचा एकूण २९ जागांवरविजय झाला आहे. बहुमताच आकडा पार करण्यासाठी काँग्रेसला आणखी ६ जागांवर विजय आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष येथे १० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाचा आतापर्यंत १६ जागांवर विजय झाला आहे. भाजपा आणखी १० जागांवर आघाडीवर आहे.

14:37 (IST) 8 Dec 2022
काँग्रेसचा ९ जागांवर विजया ३० जागांवर आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. येथे काँग्रेसचा आतापर्यंत ९ जागांवर विजय झाला आहे. तर काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे. भाजपाचा ९ जागांवर विजय झाला असून १७ जागांवर भाजपा आघाडीवर आहे.

13:44 (IST) 8 Dec 2022
हिमचाल प्रदेशमध्ये काँग्रेसने मारली मुसंडी ३९ जागांवर आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये आप पक्षाने मुसंडी मारली आहे. येथे काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कारण सध्या येथे काँग्रेस एकूण ३९ जागांवर तर भाजपा सध्या २१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केलेला आहे.

11:19 (IST) 8 Dec 2022
भाजपा-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच, तीन जागांवर अपक्ष आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. सध्या काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाचे उमेदवार २९ जागांवर आघाडीवर आहेत. तीन जागांवर अपक्ष आमदार सरस ठरत आहेत.

10:26 (IST) 8 Dec 2022
भाजपा-काँग्रेसमध्ये रस्सीखेच, ३ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या ३२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे.

10:08 (IST) 8 Dec 2022
काँग्रेसने टाकले भाजपाला मागे, तीन उमेदवार आघाडीवर

काँग्रेसने भाजपाला पुन्हा एकदा मागे टाकले आहे. सध्या काँग्रेस ३३ जागांवर पुढे आहे. तर भाजपा ३२ जागांवर आघाडीवर आहे. तीन अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

09:46 (IST) 8 Dec 2022
हिमाचल प्रदेशमधील सर्व ६८ जागांचे प्राथमिक अंदाज आले समोर, अपक्ष उमेदवारांना येणार महत्त्व

हिमाचल प्रदेशमध्ये सर्व ६८ जागांचे प्राथमिक अंदाज समोर आले आहेत. येथील एकूण ६८ जागांपैकी भाजपा ३३ जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस ३२ जागांवर पुढे आहे. येथे अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या ३ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

09:31 (IST) 8 Dec 2022
काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत, कोण मारणार बाजी

सध्या काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. अद्याप मतमोजणी सुरू असून काँग्रेस ३३ जागांवर पुढे आहे तर भाजपाचे उमेदवार ३२ जागांवर आघाडीवर आहेत. ३ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

09:16 (IST) 8 Dec 2022
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने काँग्रेसला टाकलं मागे, अपक्ष ४ जागांवर आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणी सुरू आहे. मतदानाच्या सुरुवातीला भाजपा पिछाडीवर होती. तर काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मात्र आता भाजपाने काँग्रेसला मागे टाकलं आहे. सध्या भाजपा ३१ जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस पक्ष ३० जागांवर पुढे आहे.

09:03 (IST) 8 Dec 2022
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा पिछाडीवर, पाच जागांवर आपक्ष उमेदवार आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा पिछाडीवर आहे. आप पक्ष एकाही जागेवर चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. पाच अपक्ष उमेदवार सध्या येथे आघाडीवर आहे.

08:36 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा पिछाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा पिछाडीवर आहे. सध्या काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २१ जागांवर पुढे आहे. तर अपक्ष ३ जागांवर पुढे आहेत.

08:05 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Result 2022 Votes Counting Starts : हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात

हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या कार्यालयांत निवडणूक अधिकारी मतमोजणी करत आहेत. काही क्षणांत पहिला निकाल हाती येणार आहे.

08:00 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Election Result 2022 : आम्हालाच बहुमत मिळणार; काँग्रेस, भाजपाचा दावा

या निवडणुकीत आम्ही नवा इतिहास रचणार असा दावा भाजपाकडून केला जात आहे. तर यावेळी आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल असे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत.

07:54 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Election Result 2022 : सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात

हिमाचल प्रदेशमध्ये आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी निवडणूक निकालाने पूर्ण तयारी केली आहे.

07:40 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Election Result 2022 : ६८ जागांसाठी एकूण ४१२ उमेदवार रिंगणात

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ६८ जागांसाठी एकूण ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. तर या निवडणुकीत एकूण ७५.६ टक्के मतदान झाले आहे.

07:37 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Election Result 2022 : मागील निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत

हिमाचल प्रदेशमध्ये मागील निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली होती. तेव्हा भाजपाने एकूण ६८ जागांपैकी ४४ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. मात्र यावेळी भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. मागील वेळी काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या.

07:36 (IST) 8 Dec 2022
Himachal Pradesh Election Result 2022 : काही क्षणांत मतमोजणीला होणार सुरुवात

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या राज्यात कोणाची सत्ता येणार हे काही क्षणांतच स्पष्ट होणार आहे.

Himachal Pradesh Election Result 2022 Live Updates

 गुजरात निवडणूक निकाल २०२२ लाइव्ह

हिमाचल प्रदेश हे राज्य भाजपासाठी खूप महत्त्वाचे  आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले होते. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जाहीर सभा घेत हिमाचल प्रदेशच्या जनतेला भाजपाला मतदान करावे, असे आवाहन केले होते. सध्या या निवडणुकीसाठी एकूण ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत

Story img Loader