भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरात ४०० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पावरून विरोधक भाजपावर टीका करत आहेत. विरोधकांच्या मते भाजपाला संविधान बदलण्यासाठी आणि देशातील आरक्षण संपवण्यासाठी ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. विरोधकांच्या या आरोपांवर भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी उत्तर दिलं आहे. सरमा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत म्हणाले, भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० जागांचा टप्पा ओलांडला तर मथुरेत कृष्णाचं भव्य मंदिर उभारलं जाईल. तसेच काशीमधील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचं मंदिर बांधलं जाईल.

हिमंता बिस्व सरमा म्हणाले, मुघलांनी आपल्या देशाचं जे जे नुकसान केलंय ते आम्ही दुरुस्त करू. देशात अद्याप बरीच साफसफाई बाकी आहे. भाजपाने राम मंदिर उभारण्याचं वचन पूर्ण केलं आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मोठा विजय व्हायला हवा.

PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
shantanu deshpande bharat shaving company
“…तर ९९ टक्के भारतीय कामावर येणारच नाहीत”, नामांकित कंपनीच्या CEO चं विधान चर्चेत, नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया!
dharmaraobaba atram reaction on getting minister post
मी शंभर टक्के मंत्री होणार, पण अडीच वर्षाने, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…

सरमा यांनी यावेळी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात आपल्याला सांगितलं जायचं की काश्मीर भारतातही आहे आणि पाकिस्तानातही. काश्मीर प्रश्नावर संसदेत कधीच चर्चा होत नव्हती. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असं कधी संसदेत म्हटलं जात नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. आता पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही भारताचा झेंडा फडकवू लागले आहेत. तिथली सध्याची परिस्थिती आणि पंतप्रधान मोदींच्या काश्मीरबाबतच्या भूमिका पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ४०० जागा जिंकलो तर पाकव्याप्त काश्मीरदेखील भारताचा भाग बनेल.

हे ही वाचा >> Ghatkopar Hording Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!

यावेळी सरमा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. सरमा म्हणाले, केजरीवाल पूर्वी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करायचे. मात्र तेच केजरीवाल आता त्यांच्या पत्नीला राजकारणात पुढे आणत आहेत. ते एका आलिशान बंगल्यात राहतात. तसेच ते जे काही बोलतात नेमकं त्याच्या उलट वागतात. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ते बरे होतील तोवर त्यांची परत तुरुंगात जाण्याची वेळ येईल. दिल्लीतील जनता अंतरिम जामीनावर तुरुंगातून बाहेर अलेल्या दिल्लीच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यावर आता विश्वास ठेवणार नाही. भाजपाविरोधात केजरीवाल यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. ज्याला राष्ट्राचा विकास करायचा असतो त्याला समोर कोणतंही आव्हान दिसत नाही. तो त्याचं काम नीट करत असतो. आज आपल्या देशातील जनतेलाही वाटतं की, केवळ नरेंद्र मोदी हेच देशाचा विकास करू शकतात.

Story img Loader