Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महायुती असा थेट सामना होता. महाराष्ट्रात काय होणार याचे विविध अंदाज लढवले जात होते, तसंच एक्झिट पोल्सनीही त्यांचे अंदाज वर्तवत महायुतीला यश मिळेल असं म्हटलं होतं. मात्र एक्झिट पोल्सने जे अंदाज वर्तवले ते साधारण १६० जागांपर्यंत होते. काही एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असंही म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. महायुतीला २३६ जागांवर विजय मिळाला आहे. आता प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा.

महायुतीच्या महाविजयानंतर पक्षीय बलाबल कसं आहे?

भाजपा -१३२ आमदार
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ आमदार
इतर ९
एकूण २३९

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल

२८८ मतदारसंघांपैकी २३९ जागांवर महायुती विजयी ठरली आहे. यानंतर महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. मात्र नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. तसंच कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही असंही ठरलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत थेट सांगितलं आहे की मुख्यमंत्री पदाचा निर्णय हे कुठल्याही निकषांवर आधारित नाही. मुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचं हे तीन पक्षांचे नेते मिळून ठरवतील. एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यांच्या पक्षांचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असे मिळून निर्णय घेतील. आमच्यात मुख्यमंत्रिपदावरुन कुठलाही वाद विवाद नाही, असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. तसंच जो निर्णय घेतला जाईल तो सगळ्यांना मान्य असेल असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात

राजकारणात शक्यतो कुठला फॉर्म्युला असतो?

ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला राजकारणात युती आणि आघाड्यांमध्ये राबवला जातो. मात्र असा कुठलाही फॉर्म्युला यावेळी ठरलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार (Devendra Fadnavis ) की नाही? हा प्रश्न अद्याप कायम आहे, कारण भाजपा किंवा महायुतीने अद्यापही कुणाचं नाव जाहीर केलं भाजपाचे १३२ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीत संख्याबळाचा विचार केला तर भाजपाचा आधीचा दावा असू शकतो.

काय शक्यता असू शकतात?

१) भाजपा महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे भाजपाकडे मुख्यमंत्री हे पद जाऊ शकतं. तसं झाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.

२) एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, भाजपा विरोधात असताना त्यांच्याकडे जाणं आणि भाजपाला सरकारमध्ये आणणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.

३) एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता असू शकते. कारण अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक मुंबईसह अनेक ठिकाणी लागले आहेत.

४) देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी आणखी एक शक्यता असू शकते.

या चार शक्यता तूर्तास तरी समोर आहेत. मात्र भाजपा काय निर्णय घेणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader