India Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Updates, 19 April : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून देशभरातील १०२ मतदारसंघातील विविध मतदान केंद्रात उत्साहात मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान, आज कोणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सर्वच पातळीवर काळजी घेतली आहे. यासाठी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी एक आदर्श घालून दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉनराड संगमा यांनी पहाटे पश्चिम गारो हिल्स येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. ते म्हणाले की, निवडणुकीदरम्यान प्रत्येक मतदाराचे मत मौल्यवान असतं. म्हणून मी माझ्या गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षकांना मतदान करण्यास सांगितले. माझ्यामुळे कोणी मतदानापासून वंचित राहिले नाही पाहिजे, असं ते म्हणाले.
कॉनराड संगमा म्हणाले, “मी आज स्वतः गाडी चालवली. चालकाला मतदानसाठी पाठवलं. तर, सुरक्षा रक्षक आधीच मतदान करून आले होते. इतर कर्मचाऱ्यांना स्थानिक बूथवर मतदानासाठी पाठवले.”
“लवकरात लवकर मतदान व्हावं याकरता मी सकाळी साडेसहा वाजता मतदान केंद्रावर पोहोचलो. पण मी सकाळी पोहोचल्यावर तेव्हा पाहिलं की मतदान केंद्र पूर्णपणे भरले होते. अनेकजण तिथे मतदानासाठी आले होते. साडेसहा वाता २०० लोक तिथे आले होते. लोक उत्साहाने सहभागी होत आहेत, हा एक चांगला संकेत आहे. मी दोन तास रांगेत उभा होतो”, असंही ते म्हणाले.
उन्हाच्या तडाख्यात मतदानाला प्रतिसाद
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. उन्हाचा तडाखा पाहता मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्यासह अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.