Iltija Mufti Srigufwara-Bijbehara Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल एका दशकानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून राज्यात आज विधानसभेची मतमोजणी चालू आहे. अनेक एक्झिट पोल्सने दावा केला होता की राज्यात इंडिया आघाडीची सत्ता येईल. बहुसंख्य एक्झिट पोल्सचे अंदाज जम्मू-काश्मीर राज्याच्या निकालाबाबत खरे ठरले आहेत. मतमोजणीच्या सहा फेऱ्यांनंतर इंडिया आघाडी बहुमताच्या आसपास पोहोचली आहे. तर भाजपा खूप पिछाडीवर आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. दरम्यान, राज्यात काही अनपेक्षित निकालही समोर आले आहेत.

नौशेरा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना पिछाडीवर आहेत. चौथ्या फेरीच्या मतमोजणीनंतर रैना ९,६६१ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे रैना यांची चिंता वाढली आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम मतदारसंघात १,४०० मतांनी आघाडीवर आहेत. तर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इत्लिजा मुफ्ती-इक्बाल श्रीगफुरा-बिजबेहरा मतदारसंघात ६,२७४ मतांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान, इल्तिजा यांनी निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. त्यांनी, पराभव मान्य करणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
JPC accepts Waqf report new Delhi
विरोधकांचे असहमतीचे पत्र; वक्फ अहवाल जेपीसीने स्वीकारला
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
raghuram rajan pm modi loksatta news
रघुराम राजन यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक; कारण नेमके काय?

हे ही वाचा >> Haryana Election Result: चेहरे पडले, जल्लोष थांबला, हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार

इल्तिजा यांनी पराभव स्वीकारला

इल्तिजा मुफ्ती-इक्बाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “जनतेचा हा निर्णय मला मान्य आहे. बिजबेहरामधील जनतेकडून मला मिळालेलं प्रेम व आपुलकी सदैव माझ्याबरोबर राहील. या निवडणूक मोहिमेत माझ्यासाठी मेहनत घेणाऱ्या जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते”.

श्रीगफुरा-बिजबेहरा मतदारसंघात मतमोजणीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. यापैकी नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यात त्या ६,२७४ मतांनी पिछाडीवर आहेत. उर्वरित तीन फेऱ्यांमध्ये फार मोठा बदल होणार नसल्याची इल्तिजा यांना कल्पना असल्याने त्यांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला आहे.

हे ही वाचा >> Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ची ५२ आणि भाजपाची २२ जागांवर आघाडी

पीडीपीच्या बालेकिल्ल्यात पराभव

श्रीगफुरा-बिजबेहरा हा विधानसभा मतदारसंघ आजवर पीडीपीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. १९६७ साली इल्तिजा यांचे आजोबा मुफ्ती मोहम्मद सय्यद हे काँग्रेसच्या तिकीटावर येथून आमदार म्हणून निडून आले होते. त्यानंतर १९९६ साली इल्तिजा यांच्या आई मेहबुबा मुफ्ती या काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडून आल्या होत्या. १९९९ पासून २०१९ पर्यंत पीडीपीचे अब्दुल रहमान भट येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. याच मतदारसंघात इल्तिजा यांचा पराभव झाला आहे.

Story img Loader