Who is Iltija Mehbooba Mufti : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत असल्याने अवघ्या देशाचं लक्ष येथे लागून राहिलं आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा विधानसभा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या, मला माझ्या आईचा चेहराच नाही तर तिची जिद्दही मिळाली आहे. मी धोरणी आहे, तर ती भावनिक आहे. हे माझं व्यक्तिमत्व काळानुसार लोकांना समजत जाईल. मी कोण आहे हे लोकांनी ओळखावे. आपण प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे, पण जे करायचं असतं ते आपल्या मनाप्रमाणेच करायचं असतं.” तसंच, “जम्मू-काश्मीरातील लोकांनी माझ्याकडे माजी प्रमुखांची मुलगी म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून पाहावे अशी माझी इच्छा आहे”, असंही त्या म्हणाल्या.

Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Asaduddin Owaisi Bhiwandi Constituency, Waris Pathan,
मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

आई आणि आजोबांचं मिश्रण

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मोहम्मद सईद (इल्तिजा मुफ्ती यांचे आजोबा) यांच्याकडून इल्तिजा मुफ्ती यांनी राजकीय घडे घेतले आहेत. “मी जे कार्य करते ते या दोघांच्या धोरणांचं मिश्रण असतं. मी दोन्हींचे मिश्रण आहे. लोकांनी मला समजून घ्यावं, माझी धोरणं समजून घ्यावीत, माझा आदर करावा, एवढीच माझी मागणी आहे”, असंही इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या.

तरुणांच्या रोजगावर लक्षकेंद्रीत

दरम्यान, त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने रोजगाराच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केलं आहे. “गेल्या पाच वर्षांत, भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आम्हाला आमच्या जमिनीपासून, आमच्या नोकऱ्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्राच्या विविध उपाययोजनांमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानेही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

हेही वाचा >> जम्मू-काश्मिरात मेहबुबांची ‘पीडीपी’ किंगमेकर?

काश्मीरमधील अंमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनाचा प्रश्न सोडवण्याची गरजही तिने व्यक्त केली. “आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना कौशल्याने सुसज्ज करणे हे माझे मुख्य लक्ष आहे”, असंही त्या म्हणाल्या.

आम्ही सत्तेचे दावेदार नाही

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग हा ‘पीडीपी’चा बालेकिल्ला असून इथल्या बिजबेहरा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांच्याऐवजी त्यांची मुलगी इल्तिजा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची वारसदार म्हणून इल्तिजाकडे पाहिले जात आहे. इल्तिजा निवडून येऊ शकतील हे खरे असले तरी ‘पीडीपी’ला ८-१० जागांवरच समाधान मानावे लागेल असे दिसते. ‘आमचा पक्ष छोटा असून आम्हाला जागाही तेवढ्याच मिळतील. आम्ही सत्तेचे दावेदार नाही’, अशी कबुली मुफ्ती यांचे विश्वासू व ‘पीडीपी’चे प्रवक्ता नजमू साकीब यांनी दिली.