Premium

गुजरातमध्ये मुस्लीम समाजाचे ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून त्यातला एकही नाही; कारण काय?

येत्या ७ मे रोजी गुजरातमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. गुजरातमध्ये एकूण ३५ मुस्लीम उमेदवार रिंगण्यात आहेत. मात्र, यापैकी एकही उमेदवार काँग्रेसने दिलेला नाही.

gujarat muslim candidate news
लोकसभा निवडणूक २०२४ (संग्रहित छायाचित्र)

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काही पक्ष जातीच्या नावावर मत मागत आहेत, तर, काही पक्ष धर्माच्या नावावर मत मागत असल्याचं चित्र आहे. अशातच येत्या ७ मे रोजी गुजरातमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. गुजरातमध्ये एकूण ३५ मुस्लीम उमेदवार रिंगण्यात आहेत. मात्र, यापैकी एकही उमेदवार काँग्रेसने दिलेला नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

म्हणून काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवाराला तिकीट नाही?

काँग्रेसने यंदा त्यांची परंपरा मोडीत काढत गुजरातमध्ये एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते म्हणाले, “भरुचमध्ये काँग्रेसने नेहमीच मुस्लीम उमेदवार दिला आहे. मात्र, यंदा गुजरातमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच यांच्यात युती आहे. त्यामुळे जागावाटपानुसार भरुचची जागा आम आदमी पक्षाकडे आहे.”

Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
maharashtra vidhan sabha election 2024 devyani farande vs vasant gite nashik central assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीय, धार्मिक मुद्दे निर्णायक
congress pawan khera talk about uncertainty on modi government
मोदींकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने केव्हाही मध्यावधी निवडणुका शक्य; काँग्रेसचे पवन खेरा यांचे भाकित
Maharashtra assembly elections 2024 confusion about who is the official candidate of Mahavikas Aghadi in Raigad
रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याचा गोंधळ सूरूच; शेकाप उमेदवारावर कारवाईची शिवसेनेची मागणी
nagpur assembly election Rebelled 28 people suspended from Congress party for 6 years
अतिलोकशाही गैर न मानणारा काँग्रेस पक्ष यावेळी मात्र कठोर…एका झटक्यात तब्बल २८…

हेही वाचा – सरकारी पैशांचा अपव्यय ते नैराश्य; सूरत मतदारसंघातून माघार घेणाऱ्या आठ जणांनी काय कारणे दिली?

बसपाकडून केवळ एका मुस्लीम उमेदवाराला तिकीट

राष्ट्रीय पक्षांबाबत बोलायचं झाल्यास, केवळ बहुजन समाज पक्षाने गांधीनगरमध्ये मुस्लीम उमेदवार दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत बसपाने पंचमहालमधून मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले होते. मात्र, त्याचा पराभव झाला होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये २५ जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण ३५ मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, २०१९ च्या तुलनेत ही संख्या कमी आहे. २०१९ मध्ये गुजरातमध्ये मुस्लीम समाजाचे एकूण ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

३५ पैकी अनेक उमेदवार अपक्ष

दरम्यान, या निवडणुकीतील ३५ उमेदवारांपैकी बहुतेक उमेदवार हे एकतर अपक्ष निवडणूक लढवत आहेत, किंवा गुजरातमधील छोट्या प्रादेशिक पक्षांनी मुस्लीम समाजातील उमेदवारांना तिकीट दिलं आहे. यासंदर्भात बोलताना, गुजरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजीरखान पठाण म्हणाले, “मागील प्रत्येक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने किमान एका तरी मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले आहे. मात्र, यंदा ते शक्य झाले नाही. कारण भरुचची जागा आता आम आदमी पक्षाकडे आहे.”

हेही वाचा – मोदींच्या मायभूमीत क्षत्रिय समाजाच्या नाराजीमुळे भाजपाचा विजय कठीण?

पुढे बोलताना पठाण यांनी दावा केला की त्यांनी काही मुस्लीम नेत्यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, जिंकण्याची शक्यता कमी असल्याने या नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. ते म्हणाले, अहमदाबाद पश्चिम आणि कच्छ हा मुस्लीम बहुल प्रदेश आहे. मात्र, या दोन्ही जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In gujarat 35 muslim candidates contesting loksabha election but not single one by congress spb

First published on: 05-05-2024 at 15:45 IST

संबंधित बातम्या