Premium

Election Results: भाजपा सत्ता राखणार तर काँग्रेसच्या ‘हातून’ पंजाबही जाणार; केवळ इतक्या राज्यांपुरता राहणार पक्ष

मागील दोन वर्षांमध्ये एकूण १० राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही

BJP And Congress
भाजपा उत्तर प्रदेशची सत्ता कायम राखणार पण पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हं (फाइल फोटो)

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार सत्तता काबिज करेल असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्री बसेल असं चित्र प्राथमिक कल दर्शवत आहेत. गोव्यामध्ये त्रिशंकू तर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं दिसत आहेत. हे प्राथमिक कल सध्या तरी काँग्रेससाठी फारच धक्कादायक ठरत असून पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यामधील सत्ताही काँग्रेसच्या हातून जाणार असं चित्र दिसतंय. मात्र पंजाबमधील सत्ता गेल्यास देशात काँग्रेस पाच राज्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे. तर भाजपा गोव्यामध्ये युतीच्या माध्यमातून सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेसला आपलीच सत्ता येणार असं वाटणाऱ्या पंजाबमध्येही काँग्रेसला फटका बसत असल्याचं चित्र प्राथमिक कल दर्शवत आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता स्थापन होणार हे एग्झिट पोलमध्ये म्हटलेलं आणि तेच आज मतमोजणीमध्ये दिसून येत आहे. ५९ जागांचा बहुमताचा आकडा असणाऱ्या पंजाबमध्ये प्राथमिक कल हे आपच्या बाजूने होते. येथे ८१ ठिकाणी आप आघाडीवर आहे.

akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Supriya Sule Badlapur, Subhash Pawar Prachar,
सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…

मागील वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये काय घडलं?
२०२१ मध्ये मे महिन्यात पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपाला सत्ता मिळाली तर इतर तीन राज्यांमधील जनतेनं स्थानिक पक्षांच्या पारड्यात कौल दिल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पश्चिम बंगालसारख्या महत्वाच्या राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळेच पश्चिम बंगालमधूनही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. पुडुचेरीमध्येही काँग्रेस ११ वरुन थेट २ जागांपर्यंत खाली घसरल्याचं पहायला मिळालं. पुडुचेरीमध्येही भाजपा आणि मित्र पक्षांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारा बहुमताचा जादुई आकडा गाठला.

आता काँग्रेस किती राज्यांमध्ये सत्तेत?
मागील वर्षीची पाच आणि या वर्षीची पाच अशा दहा राज्यांमधील निवडणुकानंतर काँग्रेस आता केवळ पाच राज्यांमध्ये थेट किंवा युतीमध्ये सत्ता असणारा पक्ष झालाय. देशात भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या १८ इतकीच राहील जर भाजपाने गोव्यामध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही सत्ता स्थापनेत यश मिळवलं.

भाजपाची एकहाती सत्ता असणारी राज्ये

> गोवा (या ठिकाणी सध्याच्या मतमोजणीनुसार त्रिशंकु परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे)
> गुजरात
> हिमाचल प्रदेश
> कर्नाटक
> मध्य प्रदेश
> उत्तर प्रदेश (भाजपाला बहुमत मिळणार असं प्राथमिक कल सांगत आहेत.)
> उत्तराखंड (भाजपाची सत्ता येणार असे प्रथमिक कल)

युती करुन भाजपा सत्तेत असणारी राज्ये

> अरुणाचल प्रदेश (जेडीयू आणि एनपीपीसोबत युती)
> आसाम (आसाम गण परिषदसोबत युती)
> बिहार (जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीसोबत युती)
> हरयाणा (जननायक जनता पार्टीसोबत युती)
> मणिपूर (नॅशनल पिपल्स पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टीसोबत युती) (सत्ता कायम राहणार)
> मेघालय (युनायटेड डेमोक्रेटीक पार्टी, नॅशनल पिपल्स पार्टी, पिपल्स डेमोक्रेटीक फ्रण्ट, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रेटीक पार्टी)
> मिझोरम (मिझो नॅशनल फ्रण्टसोबत युती)
> नागालॅण्ड (नॅशनलिस्ट डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी)
> सिक्कीम (सिक्कीम क्रांतीकारी मोर्टा, सिक्कीम डेमोक्रॅटीक फ्रण्ट (एलए) सोबत युती)
> त्रिपुरा (इंडिजिनियस पिपल फ्रण्ट ऑफ त्रिपुरासोबत युती)
> पुडुचेरी (ऑल इंडिया एन. आर. काँग्रेससोबत युती)

भाजपा विरोधी पक्षात असणारी राज्ये

> आंध्रप्रदेश
> छत्तीसगड
> दिल्ली
> झारखंड
> महाराष्ट्र
> ओदिशा
> राजस्थान

काँग्रेसचं सरकार असणारी राज्यं

> महाराष्ट्र (शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती)
> राजस्थान
> पंजाब (प्राथमिक कल हे सत्ता आपच्या हाती जाणार असं दर्शवत आहे)
> छत्तीसगड
> झारखंड (झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्र पक्षांसोबत युती)
> तामिळनाडू (डीएमकेसोबत युती)

काँग्रेस आणि भाजपा दोघांचंही सरकार नसणारी राज्ये

> पश्चिम बंगाल
> तेलंगणा
> आंध्र प्रदेश
> ओदिशा
> केरळ

काँग्रेसला पंजबामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या ठिकाणी आपची सत्ता असेल असं चित्र दिसत असून आपची सत्ता असणारं दिल्लीनंतर पंजाब हे दुसरं राज्य ठरणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India political map as congress reduces to 5 states scsg

First published on: 10-03-2022 at 12:31 IST

संबंधित बातम्या