Ishan Kishan Father Pranav Kumar Pandey will join JDU: भारतीय संघाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू ईशान किशनचे वडील प्रणव कुमार पांडे उर्फ ​​चुन्नू आज (२७ ऑक्टोबर) जनता दल युनायटेडमध्ये सामील होणार आहेत. पाटणा येथील जेडीयू कार्यालयात ते हजारो समर्थकांसह पक्षाचे सदस्यत्व घेणार आहेत. पाटणा येथील प्रदेश कार्यालयात जेडीयूच्या पुनर्मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात ते जेडीयूचे सदस्यत्व घेणार आहेत. प्रणव कुमार पांडे यांची आई सावित्री शर्मा या नवाडा येथील सुप्रसिद्ध महिला डॉक्टर आहेत. जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेशसिंह कुशवाह यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

कोण आहेत प्रणव कुमार पांडे?

इशान किशनचे वडील प्रणव कुमार पांडे हे व्यवसायाने बिल्डर आहेत. ते आपल्या कुटुंबासह पाटणामध्ये राहतात. पाटण्यात त्यांचे मेडिकल स्टोअरही आहे. ते भूमिहार ब्राह्मण कुटुंबातील आहेत. प्रणव पांडे यांची आई सावित्री शर्मा या नवाडा येथील माजी सिव्हिल सर्जन तसेच प्रसिद्ध महिला डॉक्टर आहेत. प्रणव कुमार यांचे वडील रामुग्रह सिंह हे गोर्डिहा येथे राहतात आणि शेती करतात.

हेही वाचा – NCP Candidate List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?

प्रणव पांडे हे नवाडा येथेच लहानाचे मोठे झाले, त्यांचे प्राथमिक शिक्षणही इथेच झाले. नवाडा येथे त्यांना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि डॉक्टर शत्रुघ्न प्रसाद सिंह यांचे मार्गदर्शन लाभले. ते नितीश कुमार यांच्या समता पक्षाचे संस्थापक सदस्यही आहेत. प्रणवकुमार पांडे यांना व्यवसायाबरोबरत समाजसेवेचीही आवड आहे. त्यांचा मुलगा इशान किशन हा भारतीय संघाचा प्रसिद्ध यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने २ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त २७ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सध्याच्या घडीला इशान किशन हा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय अ संघामध्ये इशान किशनला संधी देण्यात आली आहे. या मालिकेसाठीच्या त्याच्या निवडीनंतर इशान किशनला लवकरच भारतीय संघात संधी मिळेल असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan father pranav pandey set to join nitish kumar jdu today know about him bdg