लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज पार पडला. १ जून पर्यंत बाकीचे पाच टप्पे पार पडणार आहेत. भाजपाने ३७० तर एनडीएसह ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते आता मोदी निवडून येणार नाहीत असं सांगत आहेत. आज शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोल्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देणं धोक्याचं आहे असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
“आत्ताच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी काम केलं. मात्र मोदींच्या विरोधात बोलले म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलं. हे पाहून आम्हाला लक्षात आलं की मोदी देशात हुकूमशाही आणणार.” असं शरद पवार म्हणाले.
मोदींच्या हेतूबाबत माझ्या मनात शंका
“या देशातला सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे या लोकांची हिताची चांगली भावना या गृहस्थाच्या मनात आहे की नाही याची मला शंका वाटते. या व्यवसायांमध्ये ३६ टक्के शेती आणि शेतीशी निगडीत दुग्धव्यवसाय आहेत. शेतकऱ्यांचे हित व्हावं असं मोदींना वाटतं का? माझ्या मनात तर याबाबत शंका आहे.” असंही शरद पवार म्हणाले.
मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक
“विदेशातून काही लोक आपल्या देशात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्या विदेशातल्या लोकांची आणि माझी भेट झाली. त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या देशात का आलात? तर त्यांनी मला सांगितलं या देशात लोकशाही टिकणार की नाही हे भगण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे ही निवडणूक सोपी नाही. नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक आहे.” असं शरद पवारांनी सांगोल्यातल्या सभेत म्हटलं आहे.
हे पण वाचा- धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका, “तुम्ही केलं की ते संस्कार आम्ही केलं की आम्ही गद्दार?”
शरद पवारांचं लोकांना आवाहन
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने शरद पवार यांनी सभेत बोलताना स्थानिक लोकांना आवाहन केलं. गेल्या अडीच वर्षांमध्ये लोकशाहीची एकही निवडणूक झालेली नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका असेल, या निवडणुका सरकारने होऊ दिल्या नाहीत. हे हुकूमशाहीचं सरकार परत देशात येऊ द्यायचे नसेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.