लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासह देशातले पाच टप्पे पार पडले आहेत. तसंच २५ मेच्या दिवशी सहावा टप्पाही पार पडला आहे. आता १ जून रोजी सातवा आणि अखेरचा टप्पा देशात पार पडणार आहे. ४ जून या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाच्या दिवसाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातले पाच टप्पे संपल्याने आता निकालाच्या दृष्टीने तयारी करण्यात येते आहे. अशात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केला आहे.

ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँग रुममध्ये

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी २४ तास सुरक्षा दलांचा बंदोबस्तही तैनात आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. जळगाव येथे वखार महामंडळाच्या गोदामात ही स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही डिस्प्ले चार मिनिटं बंद झाला होता ज्यावरुन आरोप सुरु झाले आहेत. अशात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी ईव्हीएम वरुन भाजपावर आरोप केला आहे.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Candidates say Raj Thackeray cheated citizens of Vaidarbh
उमेदवार म्हणतात राज ठाकरेंकडून वैदर्भियांची फसवणूक
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
shiv thakare and big boss 16 contenstant dancing video
Video : ‘लडकी आंख मारे’वर शिव ठाकरे थिरकला, त्याच्यासह Bigg Boss १६ च्या स्पर्धकांनीही केला डान्स; चाहते म्हणाले, “चुगली करणारे…”

२६ मे च्या दिवशी काय घडलं?

जळगवा आणि रावेर मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोन्ही मतदारसंघातले ईव्हीएम हे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. २६ मे च्या दिवशी सकाळी ९ ते सकाळी ९ वाजून ४ मिनिटं अशी चार मिनिटं सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद झाला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. मात्र वीज पुरवठा खंडीत झाला होा त्यामुळे जनरेटर, इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करत असताना ही चार मिनिटं गेली आणि डिस्प्ले बंद झाला होता असं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. मात्र उन्मेष पाटील यांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केला आहे.

काय म्हटलं आहे उन्मेष पाटील यांनी?

“भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी स्ट्राँग रुममध्ये फिरत आहेत. तसंच जनरेटर बॅक अप घेताना सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होणं ही बाब संशयास्पद आहे.” असं आता उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होण्यामागे जे लोक कारणीभूत आहेत अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असंही उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर जवळपास १० दिवसांनी हा प्रकार घडल्याने याची चर्चा जळगावात रंगते आहे. तसंच उन्मेष पाटील यांच्या आरोपांनीही खळबळ उडवली आहे.