Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Afzal Guru Brother Aijaz Ahmad : हरियाणामध्ये मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज चुकवत सलग तिसऱ्यांदा भाजपाने सत्ता कायम राखली आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षांनी पुन्हा एकदा ‘अब्दुल्ला’ सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या दोन्ही राज्यांमध्ये प्रभाव पाडण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. जूनमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ही देशातील पहिलीच निवडणूक होती. तसेच या राज्यात १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवलं आहे. फुटीरतावादी इंजिनिअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष तसेच जमात-ए-इस्लामीला फारसं यश मिळालं नाही.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्री होतील असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे. ओमर अब्दुल्ला हे बडगाम व गंदेरबल या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला, भाजपाची जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी झाली आहे. जम्मूतील ४३ पैकी २९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. काश्मीरमध्ये त्यांना फारसं यश मिळालं नाही. काश्मीर खोऱ्यात ४७ जागा आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने ४२ व काँग्रेसने सहा जागा जिंकल्या. तर, भाजपाला २९, पीडीपीला ३, जेपीसीला एक जागा मिळाली आहे. सात जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Bhokar Assembly Election 2024 SriJaya Chavan
Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण विरुद्ध तिरुपती कोंढेकरांमध्ये अटीतटीची लढत; भोकरमध्ये कोणाचं पारडं जड?
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान
Deepak Kesarkar challenge increased due to rebellion from BJP
लक्षवेधी लढत: सावंतवाडी : बंडखोरीमुळे केसरकरांच्या आव्हानात वाढ
Assembly Election 2024, Chandrapur District, Chandrapur, Ballarpur, Rajura, Varora, Chimur, Bramhapuri,
निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रवेश, समर्थन अन् जेवणावळींना वेग

हे ही वाचा >> जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची पाळेमुळे घट्ट, काँग्रेसला दुहेरी आकडा गाठतानाही दमछाक!

अफझल गुरुच्या भावाला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या जनतेने फुटीरतावादी उमेदवारांना सपशेल नाकारलं आहे. २००१ साली भारतीय संसदेवर झालेल्या दहतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला दहशतवादी अफझल गुरूच्या भावालाही काश्मिरी जनतेने ठेंगा दाखवला आहे. अफझल गुरूचा भाऊ ऐजाज अहमद गुरू हा सोपोर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्याला या निवडणुकीत केवळ १२९ मतं मिळाली आहेत. एजाजला NOTA (None of the above) पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवारी इरशाद रसूल कर विजयी झाले आहेत. इरशाद यांना २८,८७५ मतं मिळाली आहेत. तर, ३४१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता.

Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Afzal Guru Brother Aijaz Ahmad
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Afzal Guru Brother Aijaz Ahmad (फोटो : भारतीय निवडणूक आयोग)

हे ही वाचा >> गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी

एजाज अहमद सोपोरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, मतदारांनी त्याला नाकारलं आहे. डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अफझल गुरुला अटक करण्यात आली होती. अनेक वर्षे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. तो या कटात सहभागी असल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी त्याला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.