Jammu and Kashmir Assembly Election 2024 Vote Counting Updates : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात मतदान झाले. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली असून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. निकालाआधी जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीच्या बाजुने कौल देण्यात आला होता, तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने ४२ व काँग्रेसने ६ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीने बहुमत मिळवलं असून हे पक्ष लवकरच सत्तास्थापन करणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं पक्षाचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Jammu and Kashmir Vidhan Sabha Election 2024 Vote Counting Live Updates, 08 October 2024 : जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल पाहा एकाच क्लिकवर
खुर्शीद अहमद शेख (लंगते)
शबीर अहमद कुल्ले (शोपियन)
प्यारे लाल शर्मा (इंदरवाल)
डॉ. रामेश्वर सिंह (बनी)
सतीश शर्मा (छंब)
मुझफ्फर इक्बाल खान (तन्नमंदी SC)
चौधरी मोहम्मद अक्रम (सुरणकोटे ST)
जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स
साजिद गनी लोन (हंदवाडा)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
मोहम्मद युसूफ तरीगमी (कुलगाव)
आम आदमी पक्ष
मेहराज मलिक (डोडा)
मीर मोहम्मद फयाज (कुपवाडा)
रफीक अहमद नाईक (त्राल)
वाहिद उर रहमान (पुलवामा)
इरफान हाफिज लोन (वाघोरा – क्रीरी)
निजामउद्दीन भट (बंदिपोरा)
तारिक हमीद करा (सेंट्रल शालटेंग)
गुलाम अहमद मीर (दूरू)
पीरजादा मोहम्मद सय्यद (अनंतनाग)
इफ्तकार अहमद (राजौरी ST)
शगून परिहार (किश्तवार)
सुनील कुमार शर्मा (पदर – नागसेनी)
दिलीप सिंह (भदरवाह)
शक्ती राज परिहार (दोडा पश्चिम)
बलदेव राज शर्मा (श्री माता वैष्णो देवी)
पवन कुमार गुप्ता (उधमपूर पश्चिम)
रणबीर सिंह पठानिया (उधमपूर पूर्व)
बलवंत सिंह मनकोटिया (चेनानी)
सुनील भारद्वाज (रामनगर SC)
सतीश कुमार शर्मा (बिल्लावार)
दर्शन कुमार (बसोहली)
राजीव जसरोटिया (जसरोटा)
डॉ. भारत भूषण (कठुआ SC)
विजय कुमार (हिरानगर)
देविंदर कुमार मान्याल (रामगढ SC)
चंदर प्रकाश (विजयपूर)
राजीव कुमार (बिश्नाह SC)
घारू राम (सुचेतगढ SC)
डॉ. नरिंदर सिंह रैना (आर एस पुरा – जम्मू दक्षिण)
विक्रम रंधवा (बहू)
युधवीर सेठी (जम्मू पूर्व)
देवेंदर सिंह राणा (नागरोटा)
अरविंद गुप्ता (जम्मू पश्चिम)
शाम लाल शर्मा (जम्मू उत्तर)
सुरिंदर कुमार (मार SC)
मोहनलाल (अखनूर SC)
रणधीर सिंह (कालाकोटे – सुंदरबनी)
कुलदीप राज दुबे (रईसी)
सुरजीत सिंह स्लथिया (संबा)
१) जावेद अहमद मिर्चल (कर्नाह)
२) सैफुल्लाह मीर (त्रेहगम)
३) कैसर जमशेद लोन (लोलब)
४) इरशाद रसूल कर (सोपोर)
५) जाविद अहमद दार (रफियााबाद)
६) जाविद हसन बेग (बारामुल्ला)
७) पिरजादा फारूक अहमद शाह
(गुलमर्ग)
८) जावेद रियाझ (पट्टन)
९) हिलाल अकबर लोन (सोनावरी)
१०) नाझीर अहमद खान (गुरेझ (ST)
११) मियाँ मेहर अली (कांगन)
१२) ओमर अब्दुल्ला (गंदरबल)
१३) सलमान सागर, (हजरतबल)
१४) अली मोहम्मद सागर (खन्यार)
१५) शमीम फिरदौस (हब्बकदल)
१६) शेख अहसान अहमद (लाल चौक)
१७) मुश्ताक गुरू (चन्नापोरा)
१८) तन्वीर सादिक (झादिबल)
१९) मुबारिक गुल (ईदगाह)
२०) ओमरअब्दुल्ला (बडगाम)
२१) शफी अहमद वाणी (बिरवाह)
२२) सैफ उद दिन भट (खानसाहिब)
२३) अब्दुल रहीम रादर (चर-इ-शरीफ)
२४) अली मोहम्मद दार (चदूरा)
२५) हसनैन मसूदी (पंपोर)
२६) गुलाम मोहीउद्दीन मीर (राजपोरा)
२७) शोकत हुसेन गणी (झैनापोरा)
२८) सकिना मसूद (डी. एच. पोरा)
२९) पीरजादा फिरोज अहमद (देवसर)
३०) जफर अली खटाना (कोकरनाग ST)
३१) अब्दुल माजीद भट (अनंतनाग पश्चिम)
३२) बशीर अहमद शाह वीरी (श्रीगुफ्वारा – बिजबेहरा)
३३) रेयाझ अहमद खान (शांगुस – अनंतनाग पूर्व)
३४) अल्ताफ अहमद वाणी (पहलगाम)
३५) अर्जुन सिंह राजू (रामबन)
३६) सज्जाद शाहीन (बनिहल)
३७) खुर्शीद अहमद (गुलाबगड (ST)
३८) सुरिंदर कुमार चौधरी (नौशेरा)
३९) जावेद इक्बाल (बुधल ST)
४०) अजाझ अहमद जान (पूंछ हवेली)
४१) जावेद अहमद राणा (मेंढार (ST)
४२) सज्जाद शफी (उरी)
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, जम्मू काश्मीर हे भाजपासाठी महत्त्वाचं राज्य होतं. परंतु, या राज्यात त्यांना सत्ता मिळवता आली नाही. त्यांनी कलम ३७० हटवलं आणि इतरही अनेक गोष्टी केल्या तरी त्यांना ही निवडणूक जिंकता आली नाही.
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्यात आलं आहे. मात्र, हा मुद्दा यापुढेही आमच्या अजेंड्यावर असेल असं ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, “आम्ही कधीच म्हणालो नाही की कलम ३७० आता आमच्यासाठी राजकीय मुद्दा राहिेलेला नाही, किंवा हा आमचा अजेंडा नसेल. खरंतर, आम्ही स्वस्थ बसणार नाही. परंतु, ज्या लोकांनी हे कलम हटवलं त्यांच्याकडून परत मिळण्याची आम्हाला आशा नाही. आम्ही लोकांना तशी स्वप्नं दाखवणार नाही. मात्र, आम्हाला एका गोष्टीची आशा आहे की आज ना उद्या देशातील सरकार बदलेल, देशाचा पंतप्रधान बदलेल. त्यानंतर आम्ही नवे पंतप्रधान व नव्या सरकारशी चर्चा करू आणि जम्मू काश्मीर राज्यासाठी नवीन काहीतरी साध्य करू.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, “आम्ही नवी दिल्लीबरोबर चांगला ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करू. आधी सरकार स्थापन होऊ द्या. मी दिल्लीतल्या भाजपा सरकारला सल्ला देईन की तुम्ही येथील जनतेचा विचार करा. आमच्या राज्याच्या विकासासाठी आम्हाला नवी दिल्लीशी योग्य ताळमेळ ठेवावा लागेल. आमचे भाजपाशी तणावपूर्ण संबंध आहेत. मला कल्पना आहे की भाजपा आमचं सरकार मान्य करणार नाही. आम्ही देखील त्यांना फार महत्त्व देत नाही. परंतु, जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी आम्हाला नवी दिल्लीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील. तेच आमच्या लोकांसाठी गरजेचं आहे. लोकांनी आमची व भाजपाची भांडणं व्हावी यासाठी मतं दिलेली नाहीत. आमच्या जनतेला रोजगार हवा, विकास हवा, राज्याचा दर्जा हवा, वीज हवी आहे”.
#WATCH | Srinagar, J&K: On coordination with Centre after the formation of government in the UT, JKNC vice president & newly-elected MLA, Omar Abdullah says, "Let the government be formed. Ask this to the CM who will get elected. My suggestion would be that it is essential to… pic.twitter.com/IUbwiMyqNa
— ANI (@ANI) October 9, 2024
जम्मू काश्मीरमधील ७ जागांवर काँग्रेस व एनसीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. एकूण सात जागांवर दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. या सातपैकी एनसीने ४ (सोपोर, बारामुल्ला, देवसर), आपने १ (डोडा) आणि भाजपाने २ जागा (बनिहाल, नगरगोटा) जिंकल्या आहेत.
भाजपाची जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी झाली आहे. जम्मूतील ४३ पैकी २९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. काश्मीरमध्ये त्यांना फारसं यश मिळालं नाही. पक्षाच्या या कामगिरीनंतर पक्षाने सर्वत्र जल्लोष केला आहे.
रशीद इंजिनिअरच्या पक्षाने ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, अनेकांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली. सायर अहमद रेशी हा जमात-ए-इस्लामी या पक्षाकडून लढला. होता, तो पराभूत झाला, मात्र त्याने २५ हजारांपेक्षा जास्त मते घेतली.
एनसी ४२
काँग्रेस ६
भाजप २९
अपक्ष ७
अन्य ६
२००१ साली भारतीय संसदेवर झालेल्या दहतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला दहशतवादी अफझल गुरूच्या भावालाही काश्मिरी जनतेने ठेंगा दाखवला आहे. अफझल गुरूचा भाऊ ऐजाज अहमद गुरू हा सोपोर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्याला या निवडणुकीत केवळ १२९ मतं मिळाली आहेत.
काँग्रेसला भारतीय समाज कमकुवत करून आणि भारतात अराजकता पसरवून देश कमकुवत करायचा आहे. त्यामुळेच ते वेगवेगळ्या विभागांना चिथावणी देत आहेत, आग लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना भडकवण्याचा कसा प्रयत्न झाला हे देशाने पाहिले, पण हरियाणातील शेतकऱ्यांनी आपण देशासोबत, भाजपसोबत आहोत, असे सडेतोड उत्तर दिले – नरेंद्र मोदी</p>
भाजपा एनडीए सरकारला लोक सातत्याने संधी देत आहेत. आसाम, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये भाजपाची स रकार आहे. जिथं जिथं भाजपा सरकार बनवते तेथील जनता दीर्घकाळ भाजपाला समर्थन देते – नरेंद्र मोदी</p>
मतांच्या टक्केवारीच्या हिशोबात पाहिल्यास जम्मूत जितके पक्ष निवडणूक लढवत होते, त्यानुसार वोट शेअरच्या तुलनेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विजय मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांचं खूप अभिनंदन करतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>
काँग्रेस काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचं राज्य होतं. रोज लोकशाहीची हत्या होत होती. तिथेच भाजपा शासनाअंतर्गत लोकशाहीचा महापर्व शांततापूर्वक साजरा केला गेला. जम्मू काश्मीरच्या जनतेला १९८७ सालची विधानसभा निवडणूक चांगलीच लक्षात आहे. जेव्हा काँग्रेसने लोकशाहीची मस्करी उडवली होती. त्याच काश्मीर खोऱ्यात आता लोकशाही पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. दहशतीशिवाय लोकांनी आपले प्रतिनिधी निवडले आहेत. या अभूतपूर्व बदलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो – अमित शाह</p>
कांग्रेस शासन में जिस जम्मू-कश्मीर में सिर्फ आतंक का राज था और हर दिन लोकतंत्र की हत्या होती थी, वहीं भाजपा शासन में लोकतंत्र का महापर्व पूरी शान और शांति से मनाया गया।
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2024
जम्मू-कश्मीर की जनता को 1987 के विधानसभा चुनाव भी अच्छी तरह याद हैं, जब कांग्रेस ने खुलेआम धांधली कर लोकतंत्र…
जम्मू काश्मीरमधील ही निवडणूक फार महत्त्वाची होती. कलम ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यानंतरचही ही पहिलीच निवडणूक होती. यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दिसून आला. जम्मू काश्मीरातील प्रत्येक मतदाराची मी प्रशंसा करतो. जम्मू काश्मीरमधील भाजपाच्या प्रयत्नांचा मला अभिमान आहे. आमच्या पक्षाला मत देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी
These elections in Jammu and Kashmir have been very special. They were held for the first time after the removal of Articles 370 and 35(A) and witnessed a high turnout, thus showing the people’s belief in democracy. I compliment each and every person of Jammu and Kashmir for…
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024
भाजपाच्या जम्मू-काश्मीरमधील एकमेव महिला उमेदवार शगुन परिहार यांनी किश्तवार मतदारसंघातून विजय मिळवला आहे. परिहार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सज्जाद अहमद किचलू यांचा ५२१ मतांनी पराभव केला आहे. पाच वर्षांपूर्वी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात परिहार यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.
वडिलांना गमावल्यानंतर त्यांनी मोठ्या हिंमतीने कुटंबाला सावरलं. त्यानंतर त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि विधानसभा निवडणूक जिंकल्या देखील…दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील या विजयानंतर शगुन परिहार यांनी पीटीआयशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “किश्तवारमधील जनतेची मी आभारी आहे. ज्यांनी माझ्यावर व माझ्या पक्षावर विश्वास दाखवला त्या मतदारांपुढे मी नतमस्तक होते. त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी खरंच त्यांची ऋणी आहे. या पाठिंब्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचे आभार मानते. मी माझ्या प्रदेशाची सुरक्षा आणि सुरक्षितेसाठी काम करेन”.
#WATCH | J&K: BJP's leading candidate from Kishtwar Shagun Parihar says, " First of all, what I will do is that, because of security issues, we have lost so many of our army jawans, I lost my father, some have lost their brothers and sons…my efforts will be to ensure that there… pic.twitter.com/jDbIRqQAjU
— ANI (@ANI) October 8, 2024
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा विधानसभा निवडणुकीत नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतील भाजपाची पिछेहाट झाली आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसला बहुमत मिळालं असून हे दोन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार आहेत. पक्षाच्या हाराकिरीची जबाबदारी स्वीकारत रवींद्र रेना भाजपा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे.
Jammu and Kashmir Election Results 2024 : सायंकाळी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार नॅशनल कॉन्फरन्सने ४१ जागा जिंकल्या असून एका जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. तर काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीने बहुमताचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे राज्यात आता नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस मिळून आघाडीचं सरकार स्थापन करणार आहे. अशातच, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेत ते जाहीर केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, आपल्या इंडिया आघाडीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे लवकरच ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांची १० वर्षे जुनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे की “Keep Calm.. cause… i’ll be back” (थोडा धीर धरा, कारण, मी पुन्हा येईन). २०१४ च्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार कोसळलं. मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी व भारतीय जनता पार्टीने मिळून सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर चार वर्षानी हे सरकार कोसळलं. तसेच गेल्या सहा वर्षांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.अखेर १० वर्षांनी या राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. ही निवडणूक नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसच्या मदतीने जिंकली आहे. ओमर अब्दुल्ला आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ओमर अब्दुल्लांचे शब्द खरे ठरल्यामुळे त्यांची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे.
J&K Election Result 2024 Live : डोडा (पूर्व) विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवला आहे. मेहराज यांच्यामुळे आपने जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये खातं उघडलं आहे. मलिक यांनी या मतदारसंघात भाजपा, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीवर मात केली आहे. मलिक यांना २३,२२८ मतं मिळवली आहेत.
J&K Election Result 2024 Live : सायंकाळी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार नॅशनल कॉन्फरन्सने ४१ जागा जिंकल्या असून एका जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. तर काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीने बहुमताचा टप्पा गाठला आहे.
Jammu Kashmir Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. पाठोपाठ त्यांनी गंदेरबल विधानसभा निवडणूकही जिंकली आहे. अब्दुल्ला यांनी तब्बल १०,५७४ मतांच्या फरकाने गंदेरबलवर नॅशनल कॉन्फरन्सचा झेंडा फडकवला आहे. इडिया आघाडीने राज्यात बहुमत मिळवलं असून ओमर अब्दुल्ला लवकरच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Jammu Kashmir Election Results 2024 Live : भाजपाचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरिंदर चौधरी यांनी रैना यांचा ७,८१९ मतांनी पराभव केला आहे.
तीन अपक्ष उमेदवार वीजयी, चौघांची विजयाच्या दिशेने कूच
J&K Election Result 2024 Live : लोकांना स्थिर सरकार हवं आहे. त्यामुळे त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीवर विश्वास दाखवला आहे : मेहबुबा मुफ्ती
#WATCH | Srinagar | On J&K elections, PDP chief Mehbooba Mufti says, " I think the people wanted a stable government and they thought that National Conference -Congress could give that and keep BJP away." pic.twitter.com/YI2QQ1wKTL
— ANI (@ANI) October 8, 2024
J&K Election Result 2024 Live : २०१४ च्या निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये भाजपाबरोबर सत्तास्थापन करणाऱ्या पीडीपीची यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त पिछेहाट झाली आहे. त्यानंतर पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या की आम्ही एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावू.
पीडीपीने कुपवाडा व पुलवामा या दोन जागा जिंकल्या आहेत.
Jammu & Kashmir Election Results 2024 : जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बडगाम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उमर अब्दुल्ला यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी बडगामच्या मतदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला त्यांच्या अमूल्य मतांनी आशीर्वाद दिला आणि मला येथून यश मिळवून दिले. आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. जनतेने दिलेल्या या मतांसाठी स्वतःला पात्र सिद्ध करणे हेच कर्तव्य आहे”, असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
#watch बडगाम: जम्मू-कश्मीर नेशनल कॉन्फ्रेंस के उपाध्यक्ष और गांदरबल और बडगाम विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार उमर अब्दुल्ला ने कहा, "…मैं बडगाम के मतदाताओं का शुक्रिया अदा करना चाहता हूं, जिन्होंने मुझे अपने कीमती वोटों से नवाजा, मुझे यहां से कामयाब बनाकर भेजा… JKNC को पिछले 5… pic.twitter.com/IoCfXc5Vd4
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
एक्झिट पोल्सनुसार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकाल त्रिशंकू लागू शकतो
बहुतांश एक्झिट पोलने जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना निकालाकडे लक्ष लागलं आहे. आता जम्मू-काश्मीरमधील खोऱ्यातील पाच महत्त्वाचे घटक येथे आहेत. जे घटक नवीन सरकारच्या स्थापनेवर प्रभाव टाकण्याव्यतिरिक्त निवडणूक निकालांवरही परिणाम करू शकतात. यामध्ये इंजिनियर रशीद यांच्या नेतृत्वाखालील अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) आणि सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स पक्षही महत्वाचा ठरू शकतो.