Jammu and Kashmir Assembly Election 2024 Vote Counting Updates : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात मतदान झाले. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली असून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. निकालाआधी जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीच्या बाजुने कौल देण्यात आला होता, तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने ४२ व काँग्रेसने ६ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीने बहुमत मिळवलं असून हे पक्ष लवकरच सत्तास्थापन करणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं पक्षाचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे.
Jammu and Kashmir Vidhan Sabha Election 2024 Vote Counting Live Updates, 08 October 2024 : जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल पाहा एकाच क्लिकवर
Jammu and Kashmir Election Results 2024 Live : जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत नॅशनल कॉन्फरन्सने १३ जागा जिंकल्या असून इतर २८ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपाने १२ जागा जिंकल्या असून इतर १७ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. पीडीपीने दोन जागा जिंकल्या आहेत, तर दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
Jammu & Kashmir Election Results 2024 : जम्मू-काश्मीरच्या डोडा विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला. जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पार्टीचे पहिल्यांदाच खाते उघडले आहे. डोडा विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांचा विजय झाला आहे.
Jammu and Kashmir Election Results 2024 : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेत ते जाहीर केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, आपल्या इंडिया आघाडीला बहुमत मिळत असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे लवकरच ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : बडगाम विधानसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला विजयी झाले आहेत. त्यांनी पीडीपीच्या आगा सय्यद मेहदी यांचा पराभव केला आहे. अब्दुल्ला यांना ३६,०१० मतं मिळाली आहेत. तर आगा सय्यद मेहदी यांना १७,५२५ मतं मिळाली आहेत. अब्दुल्ला यांनी तब्बल १८,४८५ मतांनी विजय संपादन केला आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागा जिंकल्या असून इतर ४१ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपाने ५ जागा जिंकल्या असून इतर २० जागांवर आघाडी मिळवली आहे. पीडीपी व काँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे आठ व सात जागांवर पुढे आहेत.
Jammu and Kashmir Election Result 2024 Live : आठ मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सने गुरेज, हजरतबल आणि झाडीबलमध्ये विजय मिळवला आहे. तर भाजपाने चेनानी, उधमपूर पूर्व, बिल्लावर, बासोहली, जम्मू पश्चिम या पाच मतदारसंघात विजय मिळवला आहे.
हजरतबल विधानसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार सलमान सागर हे तब्बल १०,२९५ मतांनी विजयी झाले आहेत. सलमान यांना १८,८९० मतं मिळाली असून, त्यांनी पीडीपीच्या आशिया नकाश यांचा (८,५९५) पराभव केला आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : इंडिया आघाडीला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी कार्यकर्त्यांसमोर जल्लोष केला.
#WATCH | JKNC chief Farooq Abdullah displays a show of strength as he greets his supporters, at his residence in Srinagar.
— ANI (@ANI) October 8, 2024
As per the latest EC data, the JKNC-Congress alliance has crossed the majority mark in the #JammuKashmirElections2024 pic.twitter.com/vdG34WhYVA
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : काँग्रेस उमेदवार विनेश फोगट जुलाना विधानसभा मतदारसंघात ६,०५० हजार मतांनी आघाडीवर आहे. भाजपाचे योगेश कुमार पिछाडीवर आहेत.
#HaryanaElection | Congress candidate Vinesh Phogat is leading from Julana constituency, by a margin of 6050 votes, after round 11/15 of counting as per the latest EC data. pic.twitter.com/q5CyWepTui
— ANI (@ANI) October 8, 2024
J&K Election Result 2024 Live : निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील पहिल्या विजयी उमेदवाराची घोषणा केली आहे. कठुआ जिल्ह्यातील बशोली मतदारसंघात भाजपा उमेदवार दर्शन कुमार विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या लाल सिंह यांचा पराभव केला आहे.
Jammu & Kashmir Election Results 2024 : दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मतमोजणीच्या नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला ५२ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपा २८, तर पीडीपीचे ८ उमेदवारी शर्यतीत पुढे आहेत.
J&K Election Result 2024 Live : नौशेरा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना पिछाडीवर आहेत. चौथ्या फेरीच्या मतमोजणीनंतर रैना ९,६६१ मतांनी पिछाडीवर आहेत. रैना यांची चिंता वाढली आहे.
Jammu & Kashmir Election Results 2024 : माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम मतदारसंघात १४०० मतांनी आघाडीवर आहेत. तर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींची मुलगी इत्लिजा बिजबेहरा मतदारसंघात २ हजार मतांनी पिछाडीवर आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेची मतमोजणी चालू असून सकाळी पावणे अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ने ४८ जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपा २८ तर पीडीपीने १४ जागांवर आघाडी मिळवली आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेची मतमोजणी चालू असून सकाळी १० वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ने ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर पीडीपीने १४ जागांवर आघाडी मिळवली आहे.
Jammu & Kashmir Election Results 2024 : सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हाती आलेले निकाल पीडीपीसाठी फार चांगले दिसत नाहीत. त्यांचे केवळ ८ उमेदवार आघाडीवर आहेत. पीडीपीच्या प्रमुख महबुबा मुफ्तींची कन्या इल्तिजा बिजबेहरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. इल्तिजा या ३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : सकाळी सव्वानऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपा २६जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडीच्या ४८ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. पीडीपीचे ६ उमेदवार शर्यतीत पुढे आहेत.
J&K Election Result 2024 Live : नऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार इंडिया आघाडीने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाने २० आणि पीडीपीने सहा जागांवर आघाडी मिळवली आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : सकाळी सा़डेआठवाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपा १८ जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. पीडीपीचा एक उमेदवार शर्यतीत पुढे आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.
Jammu and Kashmir Result Live : राजौरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार इफ्तिकार अहमद म्हणाले, लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्साहात राज्यातील जनता सहभागी झाली होती. मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं. आम्हाला विश्वास आहे की जनतेने आमच्याच पारड्यात मतं टाकली असतील.
#WATCH | Rajouri, J&K: Congress candidate from Rajouri, Iftikhar Ahmed says, "In this festival of democracy people voted in large numbers. Elections were held after 10 years, there is great enthusiasm among people and this is the day of results. My best wishes to all candidates.… pic.twitter.com/nAST4zx5Ja
— ANI (@ANI) October 8, 2024
Jammu and Kashmir Result Live : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result Live Updates: सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून श्रीनगर, हंदवाडा, कुपवाडा येथील मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी दावा केला आहे की त्यांचा पक्ष राज्यात ३५ हून अधिक जागा जिंकेल.
JK Election Result 2024 LIVE : जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळ यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मतमोजणी केंद्रांच्या सभागृहात केवळ उमेदवारांनी निश्चित केलेले एजंटच जाऊ शकतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना परवानगी दिली जाईल.

अल्ताफ बुखारी यांच्या जम्मू आणि काश्मीर अपना पार्टी (जेकेएपी) आणि पीसी यांसारख्या छोट्या पक्षांचे भवितव्य निवडणुकीच्या निकालांवरून ठरवले जाईल. पीडीपीचे माजी नेते बुहारी यांनी २०२० मध्ये स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यांचा पक्ष आत्तापर्यंत फार प्रभवी ठरला नसला तरी त्यांच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. डोडाचे वरिष्ठी पोलीस अधीक्षक मोहम्मद असलम म्हणाले, पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणांनी योग्य ताळमेळ साधत राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंजिनियर रशीद यांनी दोन दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स कॉन्फरन्स (PC) प्रमुख सज्जाद लोन यांचा पराभव करून बारामुल्लाची जागा जिंकून आश्चर्यचकित केले होते. तिहार तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या रशीदने बारामुल्ला मतदारसंघातील १८ पैकी १५ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. अभियंता रशीद तेव्हापासून जामिनावर बाहेर आले. त्याच्या अवामी इत्तेहाद पार्टीने (एआयपी) काश्मीरमध्ये ३४ पेक्षा जास्त जागांवर अपक्ष म्हणून आपले उमेदवार उभे केले आहेत.
एक्झिट पोल्सनुसार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकाल त्रिशंकू लागू शकतो
बहुतांश एक्झिट पोलने जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना निकालाकडे लक्ष लागलं आहे. आता जम्मू-काश्मीरमधील खोऱ्यातील पाच महत्त्वाचे घटक येथे आहेत. जे घटक नवीन सरकारच्या स्थापनेवर प्रभाव टाकण्याव्यतिरिक्त निवडणूक निकालांवरही परिणाम करू शकतात. यामध्ये इंजिनियर रशीद यांच्या नेतृत्वाखालील अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) आणि सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स पक्षही महत्वाचा ठरू शकतो.