Jammu and Kashmir Assembly Election 2024 Vote Counting Updates : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात मतदान झाले. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली असून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. निकालाआधी जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीच्या बाजुने कौल देण्यात आला होता, तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने ४२ व काँग्रेसने ६ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीने बहुमत मिळवलं असून हे पक्ष लवकरच सत्तास्थापन करणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं पक्षाचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
Jammu and Kashmir Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर. इंडिया आघाडीला बहुमत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-10-2024 at 21:59 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSओमर अब्दुल्लाजम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirजम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४Jammu and Kashmir Assembly Election 2024जम्मू-काश्मीरJammu Kashmirभारतीय जनता पार्टीBJPभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congressमेहबुबा मुफ्तीMehbooba Mufti
+ 3 More
Web Title: Jammu and kashmir assembly election result 2024 live check jammu and kashmir vidhan sabha election vote counting live updates asc