Jammu and Kashmir Assembly Election Exit Poll 2024 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल एका दशकानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करत उस्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, आता ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

इंडिया टुडे-सी व्होटर्स : इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या सर्वेनुसार काँग्रेस आणि एन.सी. आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पीडीपीला ६ ते १२, तर अपक्षांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Fact Check: Is This Spectacular New Bridge in Jammu & Kashmir
Fact Check : खरंच जम्मू काश्मीरमध्ये आहे हा सुंदर पूल? पाहा Viral Video
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Devendra Fadnavis On Love Jihad
मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर गाय आणि फडणवीसांच्या तोंडी लव्ह जिहाद, व्होट जिहाद हे मुद्दे आताच का?
vinesh phogat priyanka gandhi
“मी देश सोडून जायचं ठरवलं होतं, बोलणीही झाली होती पण…”, विनेश फोगटचा धक्कादायक खुलासा!
elephant viral video
पिसाळलेल्या हत्तीसमोर अचानक रिक्षा झाली उलटी, पाहा चालकासह प्रवाशांनी कसा वाचवला जीव; थरारक Video Viral
Rahul Gandhi
“सत्तेत आल्यानंतर सर्वांत आधी…”, जम्मू काश्मीरच्या नागरिकांना राहुल गांधींचं आश्वासन
Shivdeep Lande IPS officer from Bihar
Shivdeep Lande: शिवदीप लांडे राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार? स्वतःच खुलासा करत म्हणाले…
Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Said I choose wrong group
“माझा ग्रुप चुकला”, ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभव चव्हाणने मान्य केली स्वतःची चूक, म्हणाला, “मी तळ्यात मळ्यात…”

इंडिया टीव्ही-CNX (सीएनएक्स) : इंडिया टीव्ही-CNX (सीएनएक्स) च्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २४ ते ३४ जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३५ ते ४५ जागा, आणि पीडीपी तसेच अपक्षांना मिळून १६ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज २४ चाणाक्य :

न्यूज २४ चाणाक्यच्या एक्झिट पोलनुसार, भाजपा २३ ते २७ जागा, काँग्रेस-एन.सी. ४६ ते ५०, पीडीपी ७ ते ११ तसेच इतर ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ : टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी.आघाडीला ३१ तो ३६ जागा, पीडीपीला जागा ५ ते ७, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क : रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३१ ते ३६ जागा, पीडीपीला ५ ते ७ जागा, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल म्हणजे काय?

एक्झिट पोल हा निवडणुकीचा सर्व्हे असतो. हा सर्व्हे मतदानाच्या काळात केला जातो. वेगवेगळ्या संस्था हा सर्व्हे करत असतात. त्या सर्व्हेच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज बांधला जातो. याबरोबरच कोणत्या पक्षाचे किती उमदेवार जिंकणार याचा अंदाज काढला जातो. यालाच एक्झिट पोल म्हटलं जातं.