Jammu and Kashmir Assembly Election Exit Poll 2024 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल एका दशकानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करत उस्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, आता ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

इंडिया टुडे-सी व्होटर्स : इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या सर्वेनुसार काँग्रेस आणि एन.सी. आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पीडीपीला ६ ते १२, तर अपक्षांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया टीव्ही-CNX (सीएनएक्स) : इंडिया टीव्ही-CNX (सीएनएक्स) च्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २४ ते ३४ जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३५ ते ४५ जागा, आणि पीडीपी तसेच अपक्षांना मिळून १६ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज २४ चाणाक्य :

न्यूज २४ चाणाक्यच्या एक्झिट पोलनुसार, भाजपा २३ ते २७ जागा, काँग्रेस-एन.सी. ४६ ते ५०, पीडीपी ७ ते ११ तसेच इतर ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ : टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी.आघाडीला ३१ तो ३६ जागा, पीडीपीला जागा ५ ते ७, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क : रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३१ ते ३६ जागा, पीडीपीला ५ ते ७ जागा, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल म्हणजे काय?

एक्झिट पोल हा निवडणुकीचा सर्व्हे असतो. हा सर्व्हे मतदानाच्या काळात केला जातो. वेगवेगळ्या संस्था हा सर्व्हे करत असतात. त्या सर्व्हेच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज बांधला जातो. याबरोबरच कोणत्या पक्षाचे किती उमदेवार जिंकणार याचा अंदाज काढला जातो. यालाच एक्झिट पोल म्हटलं जातं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir assembly elections exit poll 2024 know in details spb