जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ९० पैकी २४ जागांसाठी आज मतदान होणार असून त्यापैकी १६ जागा काश्मीर खोऱ्यात तर आठ जागा जम्मू विभागात आहेत. दुपारी एकपर्यंत ४१ टक्के मतदान पार पडले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल १० वर्षांनी आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच होत आहेत. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे. तब्बल साडेतीन दशकांच्या कालावधीत यंदा प्रथमच काश्मीर खोऱ्यात कोणत्याही भीतीविना प्रचार सभा पार पडल्या. त्यामध्ये जनतेचा उत्साही सहभागही दिसून आला. खोऱ्यात मुख्यत: नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या दोन पक्षांमध्ये लढत आहे. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत.

Lebanon Pager Blast Israel Mossad
Lebanon Pager Blast : इस्रायलच्या मोसादने साध्या पेजरचं विध्वंसक अस्त्रात कसं केलं रुपांतर? हेझबोलाचे धाबे दणाणले
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Lebanon Pager Blast Reuters
Lebanon Pager Blast : मोसादचा कट, इस्रायली तंत्रज्ञान की पेजर कंपनीशी साटंलोटं? कोणी व कसा केला लेबनॉमध्ये हिजबुल्लाहवर हल्ला?
Nawab Malik Son in Law Accident
Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात
Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसशी आघाडी केली आहे. जम्मूमध्ये काँग्रेस आणि भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. त्याशिवाय मोठ्या संख्येने अपक्ष, अनेक लहान पक्ष, जमात-ए-इस्लामीचे निवडणुकीच्या राजकारणात पुनरागमन, इंजिनीयर रशीद या नेत्याची जामिनावर सुटका आणि त्यांच्या अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) या पक्षाची अखेरच्या क्षणी जमातबरोबर झालेली युती हेही घटक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपने काश्मीर खोऱ्यातील ४७ पैकी केवळ १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ‘एआयपी’सारखे लहान पक्ष आणि अपक्ष भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप ‘एनसी’ आणि ‘पीडीपी’ करत आहेत. या १९ मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात आठ ठिकाणी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांमध्ये काँग्रेसचे प्रत्येकी चार ठिकाणी उमेदवार आहेत, तर एनसीचे जम्मूमध्ये सहा आणि काश्मीरमध्ये १२ उमेदवार आहेत.

हेही वाचा >> Amit Shah : “श्रीनगरच्या लाल चौकात बिनधोक फिरा”, सुशील कुमार शिंदेंना अमित शाह यांचा टोला

आज सकाळी सात वाजल्यापासून कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू झाले. सायंकाळी सहा वाजता मतदानाची सांगता होणार आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुसऱ्या आणि टप्प्यातील मतदान अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, ८ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आवाहन

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होत असताना मी आज मतदानास जाणाऱ्या मतदारसंघातील सर्व लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आणि लोकशाहीचा सण अधिक मजबूत करण्याचे आवाहन करतो. मी विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो, असं मोदी म्हणाले.

प्रचाराचे मुद्दे

● अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे, येथील दहशतवाद संपुष्टात आल्याचा दावा भाजपचा दावा आहे.

● नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी विजयी झाल्यास राज्यात दहशतवाद पुन्हा वाढीस लागेल, असा इशारा भाजप नेते देत आहेत.

● दुसरीकडे विरोधकांनी जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेकांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचारसभा घेतल्या.