Jammu Kashmir Election Second Phase Voting Live Updates : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात एकूण २३९ उमेदवार रिंगणात असून, २५ लाख मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. काश्मीर खोऱ्यातील तीन तर जम्मूतील तीन अशा एकूण सहा जिल्ह्यांत हे मतदान सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. या टप्प्यत सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ३५०२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, जम्मू व काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे प्रमुख उमेदवार आहेत. अब्दुल्ला हे गांदेरबल तसेच बडगाव या दोन मतदारसंघांतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, कारागृहात असलेला फुटीरतावादी सर्जन अहमद वॅघे ऊर्फ बरकती बीरवाहमधून रिंगणात आहे. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला ६१.३८ टक्के मतदान झाले होते.

Live Updates

Jammu Kashmir Vidhan Sabha Election 2024 Phase 2 Live Updates  - जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया चालू

11:24 (IST) 25 Sep 2024
परदेशी डिप्लोमॅट्स काश्मीरमध्ये दाखल झाल्याने गदारोळ

जम्मू काश्मीरमध्ये परदेशी राजकीय अधिकारी दाखल झाले आहेत. ही सर्व मंडळी निवडणुकीचं कामकाज पाहण्यासाठी काश्मीरमध्ये आल्याचं सरकारने सांगितलं आहे. मात्र यावर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, "केंद्र सरकार सातत्याने म्हणतंय की काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. इतरांनी त्यात दखल देण्याची आवश्यकता नाही. मग आता ते परदेशी राजकीय अधिकाऱ्यांना इथे का आणतायत?"

10:34 (IST) 25 Sep 2024
या नेत्यांचं नशीब पणाला

दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, जम्मू व काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे प्रमुख उमेदवार आहेत.

10:31 (IST) 25 Sep 2024
पहिल्या टप्प्यात ६१.३८ टक्के मतदानाची नोंद

पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला ६१.३८ टक्के मतदान झाले होते.

10:24 (IST) 25 Sep 2024
सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत १०.२२ टक्के मतदानाची नोंद

  • बडगाम : १०.९१ टक्के
  • गंदेरबल : १२.६३ टक्के
  • पुंछ : १४.४१ टक्के
  • रजौरी : १२.७१ टक्के
  • रियासी : १३.३७ टक्के
  • श्रीनगर : ४.७० टक्के