Jammu Kashmir Election Second Phase Voting Updates : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात एकूण २३९ उमेदवार रिंगणात असून, २५ लाख मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. काश्मीर खोऱ्यातील तीन तर जम्मूतील तीन अशा एकूण सहा जिल्ह्यांत हे मतदान सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. या टप्प्यत सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ३५०२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, जम्मू व काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे प्रमुख उमेदवार आहेत. अब्दुल्ला हे गांदेरबल तसेच बडगाव या दोन मतदारसंघांतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, कारागृहात असलेला फुटीरतावादी सर्जन अहमद वॅघे ऊर्फ बरकती बीरवाहमधून रिंगणात आहे. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला ६१.३८ टक्के मतदान झाले होते.
Jammu Kashmir Election Voting : जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५६.०५ टक्के मतदान
Jammu and Kashmir Assembly Election 2024 Phase 2 Updates : काश्मीरमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान चालू आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-09-2024 at 10:20 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSकाश्मीरKashmirजम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirजम्मू-काश्मीरJammu Kashmirनिवडणूक २०२४Electionविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
+ 1 More
Web Title: Jammu kashmir election second phase voting 2024 live updates national conference bjp asc