आजची नगरची सभा २०१४ आणि २०१९ च्या सभांचं रेकॉर्ड मोडणारी आजची सभा ठरणार आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये केलं. आज तिसरा टप्पा पार पडतो आहे, पण लोकसभेची मतदानाची महाराष्ट्रातली टक्केवारी ही कमी आहे. वाढतं तापमान हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. पण माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे की लोकशाहीसाठी सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे.

इमोशनल अत्याचार कुणीही करु नये

भाजपा किंवा महायुतीने कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करणार नाही. रोहित पवारांना जे अश्रू अनावर झाले त्याबाबत मी काय बोलायचं जनताच बोलते आहे. भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याबाबत जनताच निर्णय घेईल. बारामतीत सगळ्यांनी शांतता राखावी आणि इमोशनल अत्याचार करु नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका

बाळासाहेब ठाकरेंचं विचार उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवले

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्यपद्धती उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळेच त्यांच्या समोर अल्ला हो अकबरचे नारे सुरु आहेत. त्यांच्यासमोर टिपू सुलतान जिंदाबादचे नारे सुरु आहेत. जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं आहे. तसंच त्यांनीही जी बाळासाहेबांची परंपरा होती माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायचे ते देखील उद्धव ठाकरेंनी म्हणणं सोडून दिलं आहे. असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसंच विजय वडेट्टीवार जे बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

हे पण वाचा “मला उद्ध्वस्त करण्यासाठी…”, ‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे मतांसाठी लाचार झाले आहेत

“विजय वडेट्टीवर जे बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? काही मतांच्या लांगूलचालनासाठी उद्धव ठाकरे तोंड शिवून बसले आहेत. उज्ज्जवल निकम यांच्याविषयी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका मांडली होती, त्यांचं अभिनंदन केलं होतं. आज उद्धव ठाकरेंचे पार्टनर याच उज्ज्वल निकमांवर टीका करत आहेत. पण मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. ” असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा बॉम्ब टाकला. २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर दहशतवादी अजमल कसाब याने गोळ्या झाडल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपाने या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. दोन दिवसांपासून या वक्तव्यावर रान पेटले आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Story img Loader