महराष्ट्रात महायुतीची लाट आलेली असताना झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने त्यांचं सरकार अबाधित ठेवण्यात यश मिळवलं आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या २८ जागा आघाडीवर असून ६ जागांवर विजय झाला आहे. झारखंडमध्ये एकूण ८१ मतदारसंघासाठी निवडणूक झाली असून जवळपास ७२ मतदारसंघाचा निकाल निश्चित झाला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात येथील निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.
झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत होत आहे. काही एक्झिट पोल्सनुसार झारखंडमध्ये भाजपा युतीला ४२-२४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस आघाडीला २५ ते ३० तर इतरांना १-४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, असं असलं तरी निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. खरं तर या निवडणुकीत राज्यात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया ’ आघाडीचा सामना भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्य लढत पाहायला मिळाली.
झारखंडमध्ये किती जागांसाठी निवडणूक झाली?
झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ८१ विधानसभेच्या जागांवर तब्बल १२११ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामध्ये काही प्रमुख पक्षांसह अपक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे १२११ उमेदवारांचं भवितव्य आता उद्या निवडणुकीच्या निकालानंतर समोर येणार असून कोणाचा विजय मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.
झारखंडमध्ये किती जागांसाठी निवडणूक झाली?
झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ८१ विधानसभेच्या जागांवर तब्बल १२११ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामध्ये काही प्रमुख पक्षांसह अपक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे १२११ उमेदवारांचा निकाल आता लवकरच समोर येणार आहे.