Jharkhand Assembly Election 2024 Date Announced: झारखंडची निवडणूक कधी? दोन टप्प्यात निवडणूक घेण्याचे कारण काय?

Jharkhand Vidhan Sabha Election 2024 Schedule: झारखंड राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तसेच निकाल महाराष्ट्राबरोबरच २३ नोव्हेंबर रोजी लागेल.

CEC Rajiv Kumar
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार काय म्हणाले? (Photo – PTI)

ECI on Jharkhand Vidhan Sabha Election 2024 Dates: झारखंड विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर कारण्यात आला आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा १३ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर निकाल महाराष्ट्र राज्याबरोबरच २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. तिथे नक्षली भाग असल्यामुळे निवडणूक घेण्यास अडचणी येतात. यावेळी आम्ही फक्त दोन टप्प्यात निवडणुका घेत आहोत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

Jharkhand Assembly Election 2024
झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक

भाजपा यंदा सत्ता मिळवणार?

भाजपला यावेळी झारखंडमध्ये सत्ता मिळण्याची सर्वाधिक आशा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र हाच मुद्दा भाजप उचलण्याची शक्यता आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र हेमंत यांना जामीन मिळताच लगेच त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. चंपाई यांच्यासारख्या सामान्य आदिवासी कार्यकर्त्याचा हा अपमान आहे असा भाजपच्या टीकेचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीने जरी राज्यातील १४ पैकी ९ जागा जिंकल्या असल्या तरी आदिवासी बहुल पाच जागांवर पक्षाला यश मिळाले नाही. हेमंत सोरेन यांना अटकेची सहानुभूती काही प्रमाणात मिळाली. झारखंडमध्ये जवळपास २५ टक्के आदिवासी आहेत. भाजपला जर ही मते मिळवता आली नाहीत तर सत्ता मिळणे अशक्य आहे. गेल्या वेळी भाजपने बिगर आदिवासी मुख्यमंत्री देण्याचा प्रयोग केला तो फसला. यंदा पक्ष त्यातून धडा घेत आहे. रघुवर दास यांच्याकडे राज्याची धुरा होती, यातून आदिवासींमध्ये नाराजी वाढल्याचा फटका भाजपला बसला.

Cabinet Meeting Decision :
Cabinet Meeting Decision : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीस मुदतवाढ, शाळांना २० टक्के वाढीव अनुदान; राज्य सरकारचे मोठे निर्णय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Maharashtra weather updates
‘ऑक्टोबर हीट’चा चटका अन् हवामान खात्याचा अंदाज…
Rahul Gandhi and Sharad Pawar Maharashtra Election Politics
राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?
political events speed up ahead of assembly elections in maharashtra
बैठकींचे घट.. पक्षांतराच्या माळा! राजकीय घडामोडींना आजपासून वेग
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !
When will the Nanded Lok Sabha by election be held
नांदेडची पोटनिवडणूक कधी ?
Sharad Pawar
Sharad Pawar : “महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार ‘या’ तिघांना”, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

२०१९ साली झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jharkhand assembly elections 2024 voting to be held in 2 phases starting nov 13 results on nov 23 kvg

First published on: 15-10-2024 at 16:07 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या