महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सध्या विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन आघाडीवर आहेत. बरहैत मतदारसंघातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन २ हजार ८१२ मतांनी आघाडीवर आहेत. तसचं, माजी मुख्यमंत्री चम्पाई सोरेन हे सराईकेला मतदारसंघातून आघाडीवर आहेत. झारखंडमध्ये कोणाचं सरकार स्थापन होतं? कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतात? याची उत्तरे थोड्याच वेळात स्पष्ट होतील.
झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत होत आहे. काही एक्झिट पोल्सनुसार झारखंडमध्ये भाजपा युतीला ४२-२४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस आघाडीला २५ ते ३० तर इतरांना १-४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, असं असलं तरी निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. खरं तर या निवडणुकीत राज्यात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया ’ आघाडीचा सामना भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्य लढत पाहायला मिळाली.
हेही वाचा >> Wayanad : वायनाडमध्ये प्रियांका गांधी लाखभर मतांनी आघाडीवर; भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार आतापर्यंत झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला ३० जागा, भाजपाला २६ जागा, काँग्रेसला १३, आरजेडीला ५ आणि एजेएसयुपीला २ जागा आघाडीवर आहेत.
एनडीए आघाडीत कोणत्या पक्षांचा सहभाग?
झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, जनता दल युनायटेड, एजूएसयू पार्टी आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास).
इंडिया आघाडीत कोणत्या पक्षांचा सहभाग?
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय-एमएल पक्षांचा सहभाग आहे.
झारखंडमध्ये किती जागांसाठी निवडणूक झाली?
झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ८१ विधानसभेच्या जागांवर तब्बल १२११ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामध्ये काही प्रमुख पक्षांसह अपक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे १२११ उमेदवारांचं भवितव्य आता उद्या निवडणुकीच्या निकालानंतर समोर येणार असून कोणाचा विजय मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.