2024 Jharkhand Vidhan Sabha Election Exit Poll Updates : झारखंडमध्ये मतदानाची वेळ संपुष्टात आली असून आता वेगवेगळे अंदाज येऊ लागले आहेत. त्यानुसार, एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये सत्ताधारी इंडिया आघाडीला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. ५२ पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. तर, भाजपासमर्थित एनडीएला फक्त २३ जागाच मिळण्याची शक्यता आहे. तर, ३ अपक्षांना निवडून येण्याची संधी आहे.
टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार झारखंडमध्ये एनडीए सरकारला ४० ते ४४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, जेएमएमच्या इंडिया आघाडीला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, एखाद्या अपक्षाला संधी मिळू शकते.
हेही वाचा >> Maharashtra Assembly Exit Poll : महायुतीला १२२ पेक्षा जास्त जागा, तर मविआला किती? एक्झिट पोलचे अंदाज समोर!
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ५० जागा, तर इंडिया आघाडीला ३५ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर स्थानिक पक्ष आणि अपक्षांना ३ ते ५ जागा मिळू शकतात.
पिपल्स पल्सनुसार एनडीएला ४२ ते ४८ जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला १६ ते २३ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ८ ते १४ जागा मिळू शकतील.
p