Jitendra Awhad On EVM: राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत एकतर्फी विजय मिळवला. महायुतीच्या या प्रचंड मोठ्या विजयानंतर काही पराभूत उमेदवारांसह अनेकांनी मतदान यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकजण आरोप करत आहेत की, सत्ताधाऱ्यांनी मतदान यंत्रात गडबड केल्याने त्यांना एवढा मोठा विजय मिळाला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, अनेक दिग्गज नेते मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले असताना ते कसे विजयी झाले याबाबत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये आव्हाड काय म्हणाले?
आपल्या फेसबुक पोस्टच्या सुरुवातीला आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “१ ऑगस्ट २०२४ ठाणे जिल्ह्यात मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली होती. त्यानंतर माझे एक पथक त्यांच्या २५ सहकाऱ्यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होते. शिवाय त्यांच्याबरोबर वकिलांचे एक पथकही कामाला लागले होते. जशी ही नोटीस मिळाली, माझ्या या पथकाने यात गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली.”
“या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर माझ्या पथकाने लक्ष ठेवले. निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला. आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या, प्रसंगी संबंधित अधिकारी लोकांच्या सोबत वाद घातले, गोड बोलून काम करून घेतली. यामागे एक रणनीती होती, ती म्हणजे या लोकांना मतदान यंत्राच्या संदर्भात सुरू असणाऱ्या प्रत्येक बाबींवर आमचे लक्ष आहे, याची जाणीव त्यांना करून देण्याची”, असे आव्हाड यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे.
मतदान यंत्रांच्या वहातुकीवरही लक्ष
कळवा-मुंब्रा मतदानसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवणाऱ्या जितेंद्र आव्हा यांनी आपल्या पोस्टमध्ये मतदान यंत्रांच्या वाहतुकीवर लिहिले आहे. ते म्हणाले, “मतदान यंत्रांच्या वाहतुकीवरही आमचं लक्ष होत.दरवेळी मतदान यंत्रे एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलविण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या पथकातील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे. हे करताना निवडणूक आयोगाचे कर्मचारी योग्य ते प्रोटोकॉल पाळत आहे की नाही, यावर देखील त्यांचं लक्ष असायचं. काही गडबड असल्यास माझ्या लक्षात आणून द्यायचे. एक गाडी पोलीस सुरक्षेशिवाय मतदान यंत्रे घेऊन बाहेर निघाली होती, त्या संदर्भातील ट्विट तुमच्या लक्षात असेल.”
पोलिंग एजंट्सना प्रशिक्षण
फेसबुक पोस्टच्या शेवटी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “निवडणूक आयोगाच्या सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडल्या असल्याने,आमच्याकडे कोणत्या बूथ वर कोणती मशीन जाणार याचे तपशील होते. ते आम्ही आमच्या पोलिंग एजंट्सना दिले. परिणामी आमच्या बुथवर इतर कोणत्या मशिन्स आणण्याची हिम्मत इथ कोणी करू शकल नाही. मतमोजणीला जाताना देखील माझ्या या काउंटीग एजंट्सना वरील सगळी माहिती आम्ही दिली होती. याबाबत त्यांचे प्रशिक्षण झाले होते. थोडक्यात सांगायचं तर मतदान यंत्राच्या संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं. परिणामी माझ्या मतदारसंघात कोणतीही गडबड होऊ शकली नाही आणि मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो…!”
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४९ जागा आल्या. दरम्यान भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे तर उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव निश्चित केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आज रात्री त्याची घोषणा होण्याची शक्यता असून, दोन दिवसांत नव्या मंत्रिमंडळाता थपथविधी पार पडणार आहे.