उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसं तिथलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्ता राखण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाकडून देखील जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील उत्तर प्रदेशमध्ये ‘महिलाराज’चं आश्वासन दिलं आहे. या पार्श्वभूमीवर रोज नवनवे दावे-प्रतिदावे सुरू असताना आता महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच, त्यावरून खोचक टोला देखील लगावला आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ पोस्ट करून त्यासोबत ट्वीट केलं आहे. यामध्ये “एवढंच राहिलं होतं. देवालाही त्यांनी जातीचा दाखला देऊन टाकला”, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. हे ट्वीट आणि योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sanjay Raut on Dawood Ibrahim fact check video
संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना
Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा

“हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे उत्तर”, टिपू सुलतान वादावर जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ‘तो’ फोटो!

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ म्हणजे हिंदुस्थान टाईम्सला योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या मुलाखतीमधला एक २३ सेकंदांचा भाग आहे. यामध्ये महिला पत्रकाराने योगी आदित्यनाथ यांना “तुम्ही फक्त राजपुतांचं राजकारण करता असं म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला दु:ख होतं का?” असा प्रश्न केला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.

“बापाची जात बंधनकारक का? आई हा…”, जितेंद्र आव्हाड यांचं मुलांच्या जातीवरील ट्वीट चर्चेत

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नावर उत्तर देताना क्षत्रिय जातीविषयी भूमिका मांडली आहे. “मला अजिबात दु:ख होत नाही. क्षत्रिय जातीत जन्म घेणं काही गुन्हा नाही. या देशातली एक अशी जात आहे ज्यात खुद्द देवानं देखील जन्म घेतला आहे. आणि वारंवार जन्म घेतला आहे. त्यामुळे आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान होत असून ७ मार्च रोजी शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. १० मार्च रोजी इतर चार राज्यांसोबतच उत्तर प्रदेशमध्ये देखील मतमोजणी होणार आहे.