पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकर असं या आरोपीचं नाव आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. महत्त्वाचे म्हणजे पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची लगेच जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीने अमोल काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं होतं. श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता, हे एसआयटीच्या तपासात पुढे आलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. पण ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. त्यामुळे तो आता जामिनावर बाहेर आहे.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
chetan singh mentally
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला कारागृह प्रशासनाची सत्र न्यायालयात माहिती

हेही वाचा – गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचं जामिनानंतर जंगी स्वागत; हारतुऱ्यांनी केला सत्कार!

शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले…

श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशाबाबत शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले, “श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत. ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.” यावेळी जालन्यातून त्यांना उमेदवारी दिली जाणार का?असं विचारलं असता, “श्रीकांत पांगारकर हे जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. पण महायुतीचे जागावाटप अद्याप झालेलं नाही.त्यामुळे याबाबत सध्या काही बोलता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया अर्जून खोतकर यांनी दिली.

हेही वाचा – “…तर अमित शहा महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील”, संजय राऊतांचा गंभीर आरोप!

कोण आहे श्रीकांत पांगारकर?

जालन्यातील श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक असला तरी त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी जालन्यात शिवसेनेचा जोमात होती. त्यावेळी जगन्नाथ पांगारकर यांचा मुलगा श्रीकांतने शिवसेनेत प्रवेश केला. जालन्यात पांगारकर यांचे स्वस्त दरात धान्य व रॉकेलचा व्यवसाय होता. २००१ ते २०१० अशी सलग १० वर्षे तो शिवसेनेचा नगरसेवक होता. २०११ मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर श्रीकांत पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करु लागला. तो केदारनाथमधील जलप्रलयानंतर तिथे मदतकार्यासाठीदेखील गेला होता, अशी माहिती आहे.

Story img Loader