Kalyan East Vidhan Sabha Constituency : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या रचनेत या मतदारसंघाची निर्मिती झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेतील काही वॉर्ड येतात. तर, गणपत गायकवाड हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

कल्याण पूर्वेत गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात असलेले भाजपा आमदार गणपत गायकवाड २००९ पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. २००९, २०१४, २०१९ असे तीन टर्म म्हणजेच तब्बल पंधरा वर्षे त्यांनी कल्याण पूर्वेत काम केलं आहे. परंतु, ते आता तुरुंगात असल्याने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली.

Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Rahul Gandhi
Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग; राहुल गांधींनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, काँग्रेस- आरजेडीच्या आघाडीला बळ मिळणार?
Ashok Chavan
Ashok Chavan : आगामी निवडणुकीत महायुती फुटणार? अशोक चव्हाणांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, “घटकपक्षांच्या विरोधात…”

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीतून अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा वर्तवली. शिंदे सेनेचे महेश गायकवाडही या शर्यतीत होते. मागील दोन वर्षांपासून कल्याण पूर्व भागाचा भावी आमदार म्हणून महेश गायकवाड यांनी काम सुरू केले होते. विकास कामांबरोबर नागरी समस्या मार्गी लावण्यात ते पुढाकार घेत होते. आपल्या प्रस्थापित आमदारकीसह उमेदवारीला महेश गायकवाड हे उभरते नेतृत्व आव्हान देत आहे, म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. या अस्वस्थेमधून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात धुसफूस सुरू झाली होती.

ही अवस्था आणि एका जमीन वादाच्या प्रकरणातून आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. दोघांमधील वाद अधिक चिघळला. गोळीबार प्रकरणामुळे आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत. पूर्व भागातील उमेदवारी आपणास मिळेल अशी गणिते महेश गायकवाड यांनी केली होती. तशा प्रकारचे जनसंघटन त्यांनी केले होते. परंतु भाजपाने घाईघाईने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे इच्छूक असलेले महेश गायकवाड नाराज झाले. त्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा >> Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

दोघांनीही अर्ज भरले पण…

कल्याण पूर्वेत महायुतीतल धुसफुस समोर आली असून भाजपाच्या सुलभा गायकवाड आणि अपक्ष महेश गायकवाड यांनी अर्ज भरले आहेत. सुलभा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्तीप्रदर्शन केलं. परंतु, त्यांच्या शक्तीप्रदर्शनात शिवसेनेतील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर नव्हते. तर, महेश गायकवाड यांच्याही शक्तीप्रदर्शनात शिंदे शिवसेनेतील एकही पदाधिकारी, नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे महेश गायकवाड यांची लढत ही एकाकी लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीकडून सुलभा गायकवाड, महाविकास आघाडीकडून धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीत जसा वाद होता, तसाच वाद महाविकास आघाडीतही झाला आहे. काँग्रेसने ही जागा मागितली होती. परंतु, काँग्रेसला जागा न दिल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आणि महायुतीला एकमेकांविरोधात लढताना अंतर्गत वादाचाही सामना करावा लागणार आहे.

सुलभा गायकवाड यांच्यासाठी रविकिशन प्रचाराच्या मैदानात

गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थिततही सुलभा गायकवाड यांनी जोरदार प्रचार करा. त्यांच्या प्रचारासाठी लोकसभेचे खासदार रवि किशन प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

ताजी अपडेट

कल्याण पूर्व मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. या जिल्ह्यात ५६.५ टक्के मतदान झालं आहे. तर मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट

कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांचा विजय झाला असून त्यांना ८१ हजार ५१६ मते मिळाली. तर महेश गायकवाड यांना ५५१०८ मते मिळाली. ते २६ हजार ४०८ मतांच्या फरकाने पराभूत झाले.

Story img Loader