Premium

“लोकशाहीसाठी अनेकांनी रक्त सांडलंय, त्यामुळेच…”, मतदानानंतर कंगना रणौतचं वक्तव्य

कंगना रणौत म्हणाली, लोकशाही हे आपल्याला मिळालेलं वरदान असून निवडणूक हा आपला उत्सव आहे. त्यामुळे सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हायला हवं.

Kangana Ranaut
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान चालू आहे. (PC : ANI)

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशसह एकूण आठ राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. भारतीय जनता पार्टीने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. आज (१ जून) या मतदारसंघातही मतदान चालू असून अभिनेत्री कंगना रणौतने सकाळी तिचा मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी कंगनाने सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. कंगना म्हणाली, लोकशाही हे आपल्याला मिळालेलं वरदान असून निवडणूक हा आपला उत्सव आहे. सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हायला हवं.

कंगना रणौत म्हणाली, आज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मी आमच्या मतदारसंघात मतदान केलं. मी मतदारसंघातील लोकांमध्ये मतदानाबाबतचा मोठा उत्साह पाहतेय. मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी एकत्र येऊन मतदान करा. मतदान हा आपला सर्वात मोठा संविधानिक अधिकार आहे. हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे. तुम्ही या महापर्वात सहभागी व्हा आणि तुमचं योगदान द्या. तुम्ही जर आमच्या मतदारसंघात पाहिलं तर तिथे एखाद्या सणासारखं वातावरण दिसेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करेन की सर्वांनी या महापर्वात सहभागी होऊन मतदान करावं. लोकशाही हे आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आपल्या बांधवांनी रक्त सांडलं आहे. त्यामुळेच तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावा आणि आपली लोकशाही आणखी मजबूत करा.

maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान

“भारताला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं”, असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने काही वर्षांपूर्वी केलं होतं. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नुकताच तिने या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. त्याचबरोबर, “भारत हे एक हिंदू राष्ट्र बनलेलं मला पाहायचं आहे”, असंही ती म्हणाली. कंगना म्हणाली, “आपले पंतप्रधान हे एक युगपुरूष आहेत. आपल्या पूर्वजांनी मुघलांची गुलामी केली. त्यानंतर ब्रिटिशांची गुलामी केली. त्यानंतर आपण काँग्रेसचं कुशासन पाहिलं. त्यामुळे २०१४ मध्ये मोदींचं सरकार आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं. विचारांचं स्वातंत्र्य, सनातनचं स्वातंत्र्य, आपला धर्म बनवण्याचं-टिकवण्याचं स्वातंत्र्य, आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालं.”

हे ही वाचा >> अमित शाह यांची बोचरी टीका, “काँग्रेस एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी होणार नाही कारण त्यांना पराभव…”

भाजपाची लोकसभेची उमेदवार कंगना रणौतने “१९४७ साली धर्माच्या आधारावर पाकिस्तानला इस्लामिक रिपब्लिक स्टेट बनवलं होतं तर, मग भारताला हिंदू राष्ट्र का नाही बनवलं? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, “आम्ही भारत देशाला आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार”, अशी घोषणाही तिने अलीकडेच केली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut appeal to exercise their constitutional rights by voting for lok sabha election 2024 asc

First published on: 01-06-2024 at 11:32 IST

संबंधित बातम्या