काँग्रेसने रविवारी लोकसभेसाठी १० जणांची नवी यादी जाहीर केली. यामध्ये दिल्लीतील तीन उमेदवारांचा समावेश आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना जालंधर लोकसभा मतदारसंघातून तर जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीतून संधी देण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीतून कन्हैया कुमार विरुद्ध भाजपाचे खासदार, अभिनेते मनोज तिवारी असा सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने दिल्लीतील तीन उमेदवार जाहीर केले आहेत. कन्हैया कुमारसह जेपी अग्रवाल यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून तर उदीत राज यांना उत्तर पश्चिम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाबरोबर आघाडी केलेली आहे. त्यामुळे दिल्लीतील सात जागांपैकी तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. तर पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या चार मतदारसंघात ‘आप’ पक्ष निवडणूक लढवत आहे.

दिल्लीतील तीन जागांशिवाय पंजाबमधील सहा जागांचीही घोषणा करण्यात आली आहे. पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग उजला, फतेहगड साहीबमधून अमर सिंग, भटिंडामधून मोहिंदर सिंग सिद्धू, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा आणि पटियाला मतदारसंघातून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट दिले.

याशिवाय उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar vs manoj tiwari in key delhi seat as congress releases fresh list kvg
Show comments