Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा फैसला आज होणार असून मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. एक्झिट पोल्समध्येही त्रिशंकू स्थिती वर्तवली असली, तरी त्यात काँग्रेसकडे जास्त जागा असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कर्नाटक निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे भाजपाच्या केंद्रीय नेत्यानं भाजपाच्या विजयाचा दावा केला आहे. यासाठी या नेत्यानं गेल्या तीन निवडणुकांमधली आकडेवारी सादर केली आहे.

काँग्रेसकडे मतांची टक्केवारी तर भाजपाकडे जागा अधिक

गेल्या तीन निवडणुकांची आकडेवारी सादर करत भाजपाचे आयटी विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी गणित मांडलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक सविस्तर ट्वीटच केलं असून त्यामध्ये काँग्रेसकडे मतांची टक्केवारी जरी अधिक असली, तरी भाजपाकडे जास्त जागा येत असल्याचं गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.

Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Chhagan Bhujbals statement exposes misuse of investigation system says Jitendra Awhad
भुजबळ यांच्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर उघड- जितेंद्र आव्हाड

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

“सर्व एक्झिट पोल्सचे अंदाज मतांच्या आकडेवारीवर अवलंबून असतात. या निवडणुकीत कर्नाटकमध्ये ७३.१९ टक्के अर्थात आत्तापर्यंतचं सर्वाधिक मतदान झालं आहे”, असं या ट्वीटमध्ये मालवीय यांनी नमूद केलं आहे.

Karnataka Election Results 2023: सुरुवातीच्या कलांवरच सिद्धरामय्यांच्या मुलानं केला मोठा दावा; म्हणे, “माझे वडील…!”

“२००८ मध्ये भाजपानं ११० जागा जिंकल्या होत्या, पण पक्षाला ३३.८६ टक्के मतं मिळाली होती. दुसरीकडे काँग्रेसला ३४.७६ टक्के मतं मिळूनही जागा फक्त ८० मिळाल्या होत्या. २०१८ साली भाजपानं १०४ जागा जिंकल्या असताना पक्षाला ३६.२२ टक्के मतं मिळाली होती. पण दुसरीकडे काँग्रेसला ३८.१४ टक्के जागा मिळूनही फक्त ८० जागा जिंकता आल्या होत्या”, असं मालवीय यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

२०१३ चा अपवाद!

दरम्यान, या ट्रेंडमध्ये २०१३च्या निवडणुका अपवाद ठरल्याचंही मालवीय यांनी नमूद केलं आहे. “२०१३ मध्ये भाजपा आणि कर्नाटक जनता पक्ष यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाल्यामुळे काँग्रेसला त्याचा फायदा झाला. नाहीतर काँग्रेसला कितीही टक्के मतं मिळाली, तरी त्यांना कधीच ८० जागांच्या वर मजल मारता आलेली नाही”, असा दावाही मालवीय यांनी केला आहे.

Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटक निकालाचे कल जाहिर होताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”

“२०२३च्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला ३७ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला ४० टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. ३ टक्क्यांचा हा फरक आहे. त्यामुळे निकाल काय येईल, याचा अंदाज कुणालाही बांधता येऊ शकेल”, असंही मालवीय ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.