Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपा कार्यकर्त्यांनी बुथवर जी मेहनत घेतली, त्याआधारावर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश नक्कीच मिळेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. “जेव्हा बुथवर आपण विजय संपादन करतो, तेव्हा आपोआपच राज्याच्या निकालातही आपला विजय निश्चित होतो. तुम्ही बुथस्तरावर जी मेहनत घेत आहात, त्याच्यामुळेच पक्षाचा राज्यात विजय शक्य होणार आहे. पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मी तुमच्या आणि कर्नाटकमधील जनतेच्या सोबतच आहे.”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच कर्नाटकमधील जनता राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत देईल, असेही ते म्हणाले.

कर्नाटकला स्थिर आणि बहुमताचे सरकार केवळ भाजपा देऊ शकते. अस्थिर सरकारमुळे काय अडचणी निर्माण होतात, याची जाणीव लोकांना करून द्या, असा मंत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिला. कर्नाटक राज्यात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी संपन्न होईल. भाजपा पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी आतुर आहे तर काँग्रेस भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी झगडत आहे.

PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा…
jp nadda
दिल्लीकर लाडक्या बहिणींसाठी भाजपाची अडीच हजारांची घोषणा, जाहीरनाम्यात मोफत सिलिंडरसह ५०० रुपयांचं अनुदानही!
History of Delhi Assembly Elections Results
Delhi Election Results History: दिल्लीत पुन्हा रणसंग्राम, काय होते गेल्या पाच निवडणुकांचे निकाल? वाचा सविस्तर
EC on Delhi Election 2025 Dates| Delhi Election 2025 Dates Schedule
Delhi Election 2025 Dates : ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : आगामी महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल? बावनकुळेंचं मोठं विधान, म्हणाले, “तोच निर्णय…”
vaibhav patil loksatta online quiz winner
वैभव पाटील ठरले लोकसत्ता ऑनलाईन निवडणूक मेगा क्विझचे विजेते; जिंकला स्मार्टफोन
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “मला जी वागणूक दिली, अपमानित केलं, म्हणून मी…”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं विधान
Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

  • मागच्या काही महिन्यांमध्ये मी जेव्हा कर्नाटक राज्यात दौरा केला. तेव्हा राज्यातील जनतेने माझे मोठ्या उत्साहात स्वागत केले. माझ्याप्रमाणेच प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला राज्यातील जनतेकडून प्रेम मिळाले. यातून कर्नाटकच्या जनतेचा भाजपावरील विश्वास दिसून येतो.
  • कर्नाटकामधील जनतेचा राज्य भाजपावर खूप विश्वास असल्याचे दिसून येते.
  • इतर राजकीय पक्ष आणि भाजपा यांच्यात दृष्टीकोनाचा मोठा फरक दिसून येतो. पुढच्या २५ वर्षात देशाला विकसित करण्यासाठी भाजपा मार्गक्रमण करत आहे. आमच्या विरोधकांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे फक्त सत्ता मिळवणे. तर आमचे ध्येय आहे, पुढच्या २५ वर्षात देशाचा विकास करणे. युवकांच्या क्षमतांना वाव देऊन देशातील गरीबी हटविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
  • पुढच्या २५ वर्षांत कर्नाटकचा विकास करण्यासाठी भाजपाने युवा नेतृत्वाची निवड केली आहे.
  • लोकांची सेवा करण्याची जेव्हा जेव्हा भाजपाला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा विकासाचा वेग आणि व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाच्या वेग काहीपटींनी वाढला आहे.
  • काँग्रेसची वॉरंटी आता संपलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीला काय अर्थ उरतो? काँग्रेस म्हणजे खोटेपणाची गॅरंटी, भ्रष्टाचाराची गॅरंटी, घराणेशाहीची गॅरंटी असून बाकी काही नाही. जेव्हा काँग्रेसची वॉरंटी आधीच संपलेली असताना, ते कोणत्याही गोष्टीची गॅरंटी कसे काय देऊ शकतात.
  • जर आपल्याला देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर आपल्याला देश रेवडी कल्चर पासून मुक्त करावा लागेल.

Story img Loader