Karnataka Assembly Election 2023, Final Result: आज (शनिवार) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आता कर्नाटक निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोन प्रमुख राजकीय पक्षांना धोबीपछाड दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी १३५ जागांवर काँग्रेस पक्ष विजयी ठरला असून काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सत्ताधारी भाजपाला केवळ ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनता दल (सेक्युलर) पक्षालाही साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जेडीएसची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जेडीएसला केवळ १९ जागा जिंकता आल्या.

हेही वाचा- “भारत जोडो यात्रा मार्गावरील ९९ टक्के जागा काँग्रेसने जिंकल्या”, खरगेंनी राहुल गांधींचे मानले आभार

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल-२०२३

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल-२०२३ (फोटो सौजन्य-निवडणूक आयोग)

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, अद्याप एका जागेवरचा निकाल घोषित झाला नाही. या जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ४२.९ टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपाला ३६ टक्के मतं मिळाली आहेत. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली असून या पक्षाला १३.३ टक्के मतं मिळाली आहेत.

हेही वाचा- काँग्रेस की भाजपा? कर्नाटक निवडणुकीच्या इतिहासात कोणत्या पक्षाने जिंकल्या सर्वाधिक जागा? जाणून घ्या

मतदानाची टक्केवारी (फोटो-निवडणूक आयोग)

काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असला तरी अद्याप कर्नाटकचा आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत काँग्रेसने अद्याप घोषणा केली नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार या दोन नेत्यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता कायम आहे. या दोन नेत्यांव्यतिरिक्त कर्नाटकमधील जवळपास दहा नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election final result declare by election commission congress bjp jds rmm
Show comments