Karnataka Vidhan Sabha Election Results 2023, 13 May 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी झालेल्या विधानसभेच्या २२४ मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) पार पडली. यात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवलं आणि भाजपाचा दारूण पराभव केला. यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…

20:41 (IST) 13 May 2023
भाजपाचा दारूण पराभव, कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता, कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा…

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी

काँग्रेस – १३६ (विजय – १३४, आघाडी – ०२)

भाजपा – ६४ (विजय – ६४, आघाडी – ०१)

जेडीएस – १९ (विजय)

इतर – ०४ (विजय)

19:53 (IST) 13 May 2023
“काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंचा हल्लाबोल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय मोठा आहे. या विजयाने संपूर्ण देशात एक नवी उर्जा निर्माण केली आहे. भाजपा 'काँग्रेसमुक्त भारत' करू असं म्हणत आम्हाला चिडवत होता. मात्र, सत्य हे आहे की, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला आहे.

– काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे

19:39 (IST) 13 May 2023
VIDEO: “मी कधीही विसरू शकत नाही की सोनिया गांधी…”, कर्नाटकातील विजयानंतर डी. के. शिवकुमार ढसाढसा रडले, म्हणाले…

कर्नाटकमधील दणदणीत विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयामागे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा मोठा वाटा असल्याचं बोलले जात आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवकुमार भावनिक झालेले पाहायला मिळाले. यावेळी ते सोनिया गांधी याचं नाव घेत ढसाढसा रडले. ते शनिवारी (१३ मे) बंगळुरू येथे माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

19:38 (IST) 13 May 2023
कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “काँग्रेसचं…”

कर्नाटक विधानसभा निवडणूक केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेची केली. या निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींपासून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते होते. अखेर शनिवारी (१३) या चुरशीच्या लढतीचा निकाल लागला. यात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट करत आपली भावना व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

19:38 (IST) 13 May 2023
“कर्नाटकसाठी चांगलंच आहे की…”, भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले. भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींपासून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते होते. अखेर शनिवारी (१३) या चुरशीच्या लढतीचा निकाल लागला. यात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा…

19:15 (IST) 13 May 2023
कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव, अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पंतप्रधान मोदीच…”

कर्नाटकसारखं राज्य संधी देत आहे. काल आम्ही कर्नाटकमध्ये सत्तेत होतो, आज काँग्रेस आहे आणि उद्या आणखी कोणी असेल. ते कर्नाटक राज्यासाठी चांगलंच आहे. त्याची काही अडचण नाही.

लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. लोकसभेची निवडणूक एक स्वतंत्र निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतील याचा सर्वांना विश्वास आहे.

– अमृता फडणवीस (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी)

18:46 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रियंका गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आता जनता…”

जनतेचं लक्ष भरकटवणारं आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं राजकारण या देशात आता चालणार नाही. हिमाचल प्रदेशमध्येही आपण तेच पाहिलं आणि आता कर्नाटकमध्येही तेच पाहिलं. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, असं जनतेचं मत आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या विरोधात आणि विकासासाठी ही निवडणूक लढण्यात आली. आता जनता जागरूक झाल्याने कर्नाटक निवडणूक काँग्रेसने जिंकली. आता जनतेला त्यांचं लक्ष विचलित करणारं राजकारण नको आहे.

– प्रियंका गांधी

18:44 (IST) 13 May 2023
“बजरंग दलाची तुलना बजरंग बलीशी केल्यावर…”, कर्नाटकातील पराभवानंतर भाजपावर विरोधकांचे टीकास्त्र

देशभरातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपाच्या पराभवावर टीका केली आहे. तसंच, सध्या भारताला नव्या सकारात्मक विचारांची गरज असल्याने कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय हा जनादेश असल्याचं म्हटलं आहे. सविस्तर वृत्त येथे वाचा

17:54 (IST) 13 May 2023
“आम्ही आगामी काळात कर्नाटकच्या जनतेची…”, कर्नाटकमधील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांना धन्यवाद. भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेल्या कष्टाचं मी कौतुक करतो. आम्ही आगामी काळात कर्नाटकच्या जनतेची अधिक जोमाने सेवा करू.

– नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

17:47 (IST) 13 May 2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी काँग्रेस पक्षाचं अभिनंदन. जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना सदिच्छा देतो.

– नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

17:34 (IST) 13 May 2023

काँग्रेस – १३६ (विजय – ११९, आघाडी – १७)

भाजपा – ६४ (विजय – ५५, आघाडी – ०९)

जेडीएस – २० (विजय – १८, आघाडी – ०२)

इतर – ०४ (विजय)

17:21 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं मोठं विधान, म्हणाल्या, “आता या दोन राज्यातही…”

मी कर्नाटकच्या मतदारांना, जनतेला सलाम करते. तसेच निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांनाही मी सलाम करते. अगदी एच. डी. कुमारस्वामी यांनीही चांगली कामगिरी केली. आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका येत आहेत. मला वाटतं आता भाजपाचा या दोन्ही राज्यात पराभव होईल. ही २०२४ ची सुरुवात आहे. आता भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत अगदी १०० जागा मिळतील असंही वाटत नाही.

– ममता बॅनर्जी (मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल)

17:07 (IST) 13 May 2023
कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता, कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा…

काँग्रेस – १३६ (विजय – ११४, आघाडी – २२)

भाजपा – ६४ (विजय – ५०, आघाडी – १४)

जेडीएस – २० (विजय – १७, आघाडी – ०३)

इतर – ०४ (विजय)

17:04 (IST) 13 May 2023
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून वाद होतील का? संजय राऊत म्हणाले, “बंडखोरी करणारे…”

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकरावर टीका केली आहे. काँग्रेसचा हा विजय म्हणजे मोदी आणि शाहांचा पराभव असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसंच, कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून वाद होतील का यावरही महत्त्वाचं भाष्य केलं आहे. टीव्ही नाईन मराठीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सविस्तर वृत्त येथे वाचा

17:04 (IST) 13 May 2023
Video : “बेकायदेशीर, घटनाबाह्य म्हणणाऱ्या लोकांना कालबाह्य करून टाकलं”, एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर प्रहार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालायने नुकताच निर्णय दिला. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय गेला आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला असल्याने शिंदे सरकारही सुरक्षित राहिलं आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यातून महाविकास आघाडीवर टीका केली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. सविस्तर वृत्त येथे वाचा

17:03 (IST) 13 May 2023
Video : कर्नाटक निवडणूक निकालाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “जनमताचा कौल…”

कर्नाटकच्या निकालाचा परिणाम देशभर होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कर्नाटक हे महाराष्ट्राला लागूनच असलेले राज्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कर्नाटकच्या निकालाचा परिणाम जाणवेल अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वृत्त येथे वाचा

17:01 (IST) 13 May 2023
कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवार म्हणतात, “आमचं खरं लक्ष्य होतं…!”

शरद पवार म्हणतात, “आम्ही चमत्कार करण्यासाठी या जागा लढवल्या नव्हत्या. निपणीच्या एका जागेवर…!”

वाचा सविस्तर

16:54 (IST) 13 May 2023
“ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती!”, अशोक चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल

जनतेला विकास हवा आहे. देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. देव-धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर 'ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती', असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निर्णायक विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. काँग्रेसला समाजाच्या सर्व थरातून पाठिंबा मिळाला. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे झाले, असे ते म्हणाले.

भाजप डबल इंजीनचा गवगवा करते. मात्र कर्नाटकमध्ये त्यांना विकास करता आला नाही. शेवटी देव-धर्माच्या नावावर मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला बंधुभावाचा संदेश लोकांना भावला. काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन मिळाले. कर्नाटकातील विजयाचा पाया भारत जोडो यात्रेतच रचला गेला, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

16:49 (IST) 13 May 2023
“कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली…”, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले.

कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन.

– उद्धव ठाकरे

16:33 (IST) 13 May 2023
भाजपाच्या कर्नाटकातील पराभवावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “बळजबरी सत्तेचे…”

देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले.

– उद्धव ठाकरे (पक्षप्रमुख, शिवसेना – ठाकरे गट)

16:26 (IST) 13 May 2023
पंतप्रधान मोदींना काय संदेश द्याल? काँग्रेस नेते सिद्धरमय्या म्हणाले, “मोदींना वाटत होतं की…”

भाजपाने अनेक आरोप केले. मात्र, जनतेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. ही निवडणूक लोकसभेची उपांत्यपूर्व फेरी असून २०२४ साठी हा विजय मैलाचा दगड ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत होतं की, त्यांचा चेहरा पाहून मतदार भाजपाला मतदान करेल. मात्र, मतदारांनी त्यांना चुकीचं ठरवलं.

– काँग्रेस नेते सिद्धरमय्या

16:22 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळाल्यानंतर पुण्यात जल्लोष

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळाल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील मारुतीच्या मंदिरात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आरती करून जल्लोष साजरा केला.

16:21 (IST) 13 May 2023
Karnataka Election Results 2023 : भाजपचे प्रचारातील मुद्दे मतदारांना भावले नाहीत

कर्नाटक निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देण्यात आली, तर काही भावनिक मुद्द्यांनाही हात घातला गेला. कुणी कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली त्याचा हा गोषवारा…

वाचा सविस्तर…

<a href="https://www.facebook.com/LoksattaLive“>

16:02 (IST) 13 May 2023
पंतप्रधान, गृहमंत्री, मंत्री; सगळे प्रचाराला जाऊनही कर्नाटकात भाजपाचा पराभव, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कर्नाटकात कुठलंच सरकार पुन्हा येत नाही. एखादा अपवाद सोडला तर तेथे दर पाच वर्षांनी सरकार बदलत असतं. यावेळी आम्ही ही परंपरा तोडू असं वाटलं होतं, पण तसं करू शकलो नाही. २०१८ मध्ये आमच्या १०६ जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला ३६ टक्के मतं होती. आता आम्हाला ३५.६ टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी म्हणजे ०.४ टक्के मतं भाजपाचे कमी झालेत.

– देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

15:49 (IST) 13 May 2023

15:24 (IST) 13 May 2023
कर्नाटकात काँग्रेसचा ५५ जागांवर विजय, ८० ठिकाणी आघाडी, वाचा कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस – १३५ (विजय – ५५)

भाजपा -६५ (विजय – २२)

जेडीएस – १० (विजय)

इतर – ०४ (विजय – २)

15:19 (IST) 13 May 2023
कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार? विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले…

आमच्या पक्षात एक प्रक्रिया आहे. कधीही कोणत्याही राज्यात निवडणूक झाल्यावर आम्ही त्या प्रक्रियेनुसारच निर्णय घेतो. त्यानुसार आमदारांची बैठक बोलावली जाते. केंद्रीय निरीक्षक बैठकीला जातात. बैठकीतून जे मत तयार होईल ते पक्षश्रेष्ठींना सांगितलं जातं. त्यात मी, राहुल गांधी असे सगळे नेते असतात. सर्व लोक मिळून त्यावर निर्णय घेतो. मात्र, ही नंतरची गोष्ट आहे. हा लगेच घेतला जाणारा निर्णय नाही.

– मल्लिकार्जून खरगे (अध्यक्ष, काँग्रेस)

15:04 (IST) 13 May 2023
कर्नाटकच्या जनतेला दिलेली पाच आश्वासनं पहिल्याच मंत्रिमंडळात पूर्ण करणार – राहुल गांधी

आम्ही कर्नाटकच्या गरीब जनतेला पाच आश्वासनं दिली होती. आम्ही ही आश्वासनं पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू .

– राहुल गांधी (काँग्रेस नेते)

15:04 (IST) 13 May 2023
“कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि…”, राहुल गांधींची प्रतिक्रिया

“मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की आम्ही द्वेषाने, चुकीच्या शब्दांनी ही लढाई नाही लढली. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला हे दाखवलं की प्रेम या देशाला हवंसं वाटतंय. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे.”

– राहुल गांधी (काँग्रेस नेते)

15:00 (IST) 13 May 2023
“मला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की…”, विजयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता हेच…!”

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया!

वाचा सविस्तर

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) झाली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा…