Karnataka Vidhan Sabha Election Results 2023, 13 May 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी झालेल्या विधानसभेच्या २२४ मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) पार पडली. यात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवलं आणि भाजपाचा दारूण पराभव केला. यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
मी सर्वात आधी कर्नाटकच्या जनतेला, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला भांडवलशाहीची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या गरीब जनतेच्या शक्तीने भांडवलशाहीचा पराभव केला. हेच प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांबरोबर उभा राहिला. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो.
– राहुल गांधी (काँग्रेस नेते)
आजचा कर्नाटकातील विजय जनतेचा आहे. जनतेने आम्हाला विजयी करून एका भ्रष्ट सरकारचा पराभव केला आहे. आम्हाला पुढे खूप काम करायचं आहे. आम्ही जी आश्वासनं दिली ती आम्ही पूर्ण करू. आम्ही पाच गॅरंटी दिल्या आहेत. महिला, दलित, वंचित आणि इतर सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला. सामूहिक नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली आणि विजय मिळवला. आम्हाला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं. ते सगळीकडे फिरले आणि प्रत्येक ठिकाणी फिरले. त्यांच्या प्रभावाने अनेक ठिकाणी विजय मिळाले. त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो. त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच काँग्रेसला इतका मोठा विजय मिळवता आला. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुमची साथ देतात. आगामी काळातील निवडणुकांमध्येही आम्ही असाच विजय मिळवण्याचा प्रयत्न करू.
– मल्लिकार्जून खरगे
व्हिडीओ पाहा :
#WATCH | We won this election under collective leadership and got results, says Congress President Mallikarjun Kharge on the party's resounding victory in Karnataka. pic.twitter.com/6Cl94NKIGc
— ANI (@ANI) May 13, 2023
शरद पवार म्हणतात, “फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. पण कर्नाटकच्या जनतेनं…!”
भाजपासाठी विजय आणि पराभव नवा नाही. भाजपा कार्यकर्त्यांनी या निकालानंतर गोंधळून जाण्याची गरज नाही. पक्षाच्या पराभवावर आम्ही आत्मचिंतन करू. मी आदरपूर्वक हा पराभव स्वीकारतो.
– बी. एस. येडीयुरप्पा (भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री, कर्नाटक)
"Victory and defeat aren't new to BJP. Party workers need not be panicked by these results. We will introspect about the party's setback. I respectfully accept this verdict," says BJP leader BS Yediyurappa on the party's defeat in #KarnatakaElectionResults pic.twitter.com/LYudJZGIcL
— ANI (@ANI) May 13, 2023
अलिकडच्या काळात भाजपाकडून इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र वापरलं आह. कर्नाटकातही त्यांनी हेच केलं. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंनी केलं, तेच तिथे झालं. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केलं. गोव्यातही भाजपाचं बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करून राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलं आहे .
– शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही १३० जागांचा आकडा पार करू, हा काँग्रेसचा मोठा विजय आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा होता, कारण ते भाजप सरकारला कंटाळले होते. भाजपाने ऑपरेशन 'लोटस'वर भरपूर पैसा खर्च केला. पण राहुल गांधींच्या पदयात्रेची पक्षाला प्रचंड मदत झाली- काँग्रेस नेते सिद्धरामय्या
#KarnatakaElectionResults2023 | We will cross 130 seats also, it is a big victory of Congress party. People of Karnataka wanted a change because they were fed up with the BJP govt. BJP spent a lot of money on Operation 'Kamala'. Padyatra of Rahul ji helped as well in enthusing… pic.twitter.com/6X7wXeAYIa
— ANI (@ANI) May 13, 2023
मुंबई : जुन्या निष्ठावंत स्थानिक नेत्यांना डावलल्याचा किंवा त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीही हा इशारा असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला यातून धडा घ्यावा लागणार आहे.
“काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू.
मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे.
व्हिडीओ पाहा :
#WATCH | Karnataka Congress President DK Shivakumar gets emotional on his party's comfortable victory in state Assembly elections pic.twitter.com/ANaqVMXgFr
— ANI (@ANI) May 13, 2023
मी सिद्धरमय्या, सर्व आमदार आणि राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी जबाबदारी घेऊन बुथ पातळीवर काम केलं. हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही. मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मी नंतर भारत जोडो भवन येथे येऊन या सर्व गोष्टींवर बोलेन.”
– डी. के. शिवकुमार (अध्यक्ष, कर्नाटक काँग्रेस)
कोस्टल कर्नाटकमध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधातील रोष असल्याने काँग्रेसला काही प्रमाणात लाभ मिळाला. परंतु उत्तम संघटनेच्या जोरावर भाजपने येथे आपले यश टिकवले. धर्मनिरपेक्ष जनता दलाला येथे फारसा शिरकाव करता आलेल नाही.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी
काँग्रेस – १२८
भाजपा -६६
जेडीएस – २२
इतर – ०६
आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचा आदर करतो आणि पराभव स्वीकारतो. आम्ही रचनात्मक विरोधक म्हणून राज्यातील जनतेसाठी काम करत राहू.
– केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर
#WATCH | Union Minister Rajeev Chandrasekhar says, "…We respect and accept the verdict. We will contribute to our state and our people as a constructive Opposition…"#KarnatakaElectionResults pic.twitter.com/7s4EmfTAU0
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होतं. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले त्याचप्रमाणे कर्नाटकतही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. “ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली, तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. सविस्तर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न करूनही आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. एकदा पूर्ण निकाल जाहीर झाला की आम्ही त्याचं सविस्तर विश्लेषण करू. आम्ही या निकालावरून धडा घेत लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करू.
– मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
#WATCH | In spite of a lot of efforts put in by PM & BJP workers, we've not been able to make the mark. Once the full results come we'll do a detailed analysis. We take this result in our stride to come back in Lok Sabha elections: Karnataka CM Bommai#KarnatakaElectionResults pic.twitter.com/ftNLsV5HHG
— ANI (@ANI) May 13, 2023
Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात मराठी भाषकांची एकजूट झाल्याने चांगले यश मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी फिरताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. निपाणीत उत्तमराव पाटील…

काँग्रेस – १२१
भाजपा – ७२
जेडीएस – २४
इतर – ०७
#KarnatakaElectionResults | Congress party crosses 120 mark, leads in 121 seats while BJP is at 72 seats.#KarnatakaPolls pic.twitter.com/1Nsm72bAGs
— ANI (@ANI) May 13, 2023
भाजपने उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर हे पिछाडीवर असून, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी हे आघाडीवर आहेत. भाजपने माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी नाकारली होती. दोघांनी बंडखोरी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर देशभराचं लक्ष लागून आहे. आतापर्यंतच्या मतमोजणी कलानुसार काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. दुसरीकडे जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) २६ जागांवर आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस किंवा भाजपाने युतीसाठी संपर्क केला का? अशी विचारणा केली. यावर कुमारस्वामींनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (१३ मे) माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेस – ११८
भाजपा – ७५
जेडीएस – २४
इतर – ०७
कर्नाटकच्या सत्तेवर कोण विराजमान होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, या निकालानंतर भाजपाचं अधःपतन होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते टीव्ही नाईन मराठीशी बोलत होते. सविस्तर वृत्त वाचा
सुषमा अंधारे म्हणतात, “हा सगळ्यांसाठी एक संदेश आहे की मोदी है तो मुमकिन है असं काहीही नसतं. मोदींनाही…!”
Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसच सत्ता स्थापन करेल, असा मोठा दावा केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. सविस्तर वृत्त वाचा
कर्नाटक निवडणुकीत पक्षनिहाय मतदान
काँग्रेस – ४२.९३ टक्के
भाजपा – ३६.१७ टक्के
जेडीएस – १२.९७ टक्के
#KarnatakaElectionResults2023 | As per the latest ECI data, Congress gets 42.93% vote share, BJP gets 36.17% vote share while JDS receives 12.97% vote share. pic.twitter.com/GBDa0LntqB
— ANI (@ANI) May 13, 2023
सुरुवातीचे निकाल येत आहेत. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत त्यात खूप फरक नाही. खूप मोठा फटका नाही पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल. स्थानिक राज्याच्या निवडणुकांचे विषय वेगळे असतात. केंद्राशी याला जोडणे बरोबर नाही. सरकारविरोधी जनमताचा (अँटी इन्कमबन्सी) परिणाम जाणवतो. संपूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रया येईल.
– राधाकृष्ण विखे (महसूलमंत्री, महाराष्ट्र)

काँग्रेस – १२०
भाजपा – ६९
जेडीएस – २६
इतर – ०८
#KarnatakaElectionResults2023 | Congress leading in 120 constituencies, BJP ahead in 69 seats while JD(S) leads in 26 seats & Independent- 5 pic.twitter.com/L6p3ijcPUz
— ANI (@ANI) May 13, 2023
कोण किती जागांवर आघाडीवर?
काँग्रेस – ११५
भाजपा – ७२
जेडीएस – ३०
इतर – ०७
काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. मोठ्या संख्येने आम्ही कर्नाटकात विजयी होऊ. ४० टक्के दलाली घेणारं भाजपा सरकारविरोधात आम्ही दिलेल्या घोषणेला जनतेने स्विकारलं. तो भाजपाच्या पराभवातील मोठा मुद्दा राहिला. लोकांनी तो मुद्दा स्विकारला आणि काँग्रेसला बहुमत दिलं.
– सचिन पायलट (काँग्रेस नेते, राजस्थान)
#WATCH | #KarnatakaElectionResults | Congress leader Sachin Pilot says, "Congress has the majority. We will have a thumping victory. The slogan of "40% commission government" given by us, was accepted by the public. It was a major issue raised by us to defeat BJP. People accepted… pic.twitter.com/qg8gfkSSWD
— ANI (@ANI) May 13, 2023
कनकपुरा मतदारसंघात कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची आघाडी, भाजपाचा उमेदवार आर. अशोक मागे
Karnataka polls: Shivakumar leads, Shettar trails in early trends
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2023
Read @ANI Story | https://t.co/umPQmaaEe6#KarnatakaElectionResults #BJP #Congress #Karnataka #JDS #DKShivakumar #JagadishShettar pic.twitter.com/iUMhreAepz