Karnataka Vidhan Sabha Election Results 2023, 13 May 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी झालेल्या विधानसभेच्या २२४ मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) पार पडली. यात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवलं आणि भाजपाचा दारूण पराभव केला. यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…

Live Updates

Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…

10:30 (IST) 13 May 2023
मुख्यमंत्री कोण होणार? सिद्धरामय्या की डीके शिवकुमार, काँग्रेसची डोकेदुखी कायम

सत्ता मिळाली तरी काँग्रेसच्या अडचणी कमी होणार नाहीत. मुख्यमंत्री कोण होणार? ही डोकेदुखी राहणार आहेच. वाचा पाच शक्यता काय असू शकतात. वाचा सविस्तर

10:26 (IST) 13 May 2023
“कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं, हे मान्य करा, अनेक ठिकाणी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली.

– संजय राऊत

10:26 (IST) 13 May 2023
…तरी विजय भाजपाचाच? केंद्रीय नेत्यानं मांडलं गणित; दिली तीन निवडणुकांची आकडेवारी!

कर्नाटकमध्ये मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागांचं अजब गणित!

वाचा सविस्तर

10:22 (IST) 13 May 2023
कर्नाटक निकालाचे कल जाहिर होताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”

कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता.

– संजय राऊत

10:16 (IST) 13 May 2023
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार कोण किती जागांवर आघाडीवर?

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी

काँग्रेस – ११०

भाजपा – ७१

जेडीएस – २३

10:12 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

कर्नाटक विधानसभा निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर होताच, बंगळुरूत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष, पक्षाचा झेंडा फडकावत घोषणाबाजी

10:08 (IST) 13 May 2023
भाजपा नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिग्गाव मतदारसंघातून आघाडीवर

भाजपा नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिग्गाव मतदारसंघातून आघाडीवर, काँग्रेस उमेदवार यासिर अहमद खान पठाण मागे

10:05 (IST) 13 May 2023
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार कोण किती जागांवर आघाडीवर?

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी

काँग्रेस – १००

भाजपा – ६८

जेडीएस – २४

10:00 (IST) 13 May 2023
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार कोण किती जागांवर आघाडीवर?

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी

काँग्रेस – ९५

भाजपा – ६४

जेडीएस – २२

09:58 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस – ११९

भाजपा – ७४

जेडीएस – २६

इतर – ०५

09:56 (IST) 13 May 2023
सुरुवातीच्या कलांवरच सिद्धरामय्यांच्या मुलानं केला मोठा दावा; म्हणे, “माझे वडील…!”

काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला? सिद्धरामय्या नवे मुख्यमंत्री होण्याचे मुलाने दिले संकेत!

वाचा सविस्तर

09:46 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस – ११४

भाजपा – ८१

जेडीएस – २४

इतर – ०५

09:37 (IST) 13 May 2023
“माझ्या वडिलांना मुख्यमंत्री केलं पाहिजे”, कर्नाटक निकाल जाहिर होत असतानाच काँग्रेस नेत्याच्या मुलाची मागणी

भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकाच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री करायला हवं.

– यथिंद्र सिद्धारमय्या (काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा मुलगा)

09:28 (IST) 13 May 2023
कर्नाटकात काँग्रेसची मोठी आघाडी, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यावेळी जवळपास…”

सध्या बॅलेटमध्ये सुशिक्षितांचं मतदान आहे. परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास ४५ टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. मागच्यावेळी काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकारने जनतेच्या कौलाविरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे.

नाना पटोले (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

09:21 (IST) 13 May 2023
बेळगावातल्या ‘या’ सहा मतदारसंघांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष! ठाकरे गटाच्या प्रचाराचा फायदा होणार?

बेळगाव-निपाणीसह सीमाभागातील एकण ६ मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

वाचा सविस्तर

09:17 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस – ११९

भाजपा – ८१

जेडीएस – २०

इतर – ०१

09:00 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस – ९८

भाजपा – ८०

जेडीएस – २४

इतर – ०२

08:57 (IST) 13 May 2023
“भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि आम्ही…”, मुख्यमंत्री बोम्मईंचा मोठा दावा

कर्नाटकसाठी आजचा दिवस मोठा आहे, आज जनता राज्यासाठीचा कौल देणार आहे, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि आम्ही स्थिर सरकार देऊ, असा मला विश्वास आहे.

– बसवराज बोम्मई (मुख्यमंत्री, कर्नाटक)

08:45 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस – ८६

भाजपा – ७१

जेडीएस – १८

इतर – ००

08:42 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल : तुमच्याशी कुणी संपर्क केलाय का? जेडीएस नेते कुमारस्वामी स्पष्टच म्हणाले…

आतापर्यंत माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. एक्झिट पोलनुसार आपला वेगळ्या पर्यायांची गरज राहणार नाही. त्यामुळे निकाल काय लागतो ते पाहुयात. आणखी २-३ तासात चित्र स्पष्ट होईल. मी माझ्यासाठी कोणताही प्लॅन केलेला नाही. एक्झिट पोलनुसार माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. आम्हाला चांगल्या निकालाची आशा आहे. आमचा एक छोटा पक्ष आहे. त्यामुळे आमची कोणतीही मागणी नाही.

– एच. डी. कुमारस्वामी

08:37 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

भाजपा – ६३

काँग्रेस – ७५

जेडीएस – १७

इतर – ००

08:31 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

भाजपा – ५६

काँग्रेस – ६०

जेडीएस – १७

इतर – ००

08:26 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

भाजपा – ४६

काँग्रेस – ४४

जेडीएस – १७

इतर – ००

08:26 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे?

कोण किती जागांवर आघाडीवर?

भाजपा – ४०

काँग्रेस – ३७

जेडीएस – १४

इतर – ००

08:23 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाची आघाडी, कोण मागे? वाचा प्रत्येक अपडेट

कोण किती जागांवर आघाडीवर?

भाजपा – २८

काँग्रेस – २५

जेडीएस – ०७

इतर – ००

08:17 (IST) 13 May 2023
“काँग्रेसला अगदी सहजपणे १२० पेक्षा अधिक जागांसह बहुमत मिळेल”, काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

आज खूप मोठा दिवस आहे. काँग्रेस विजयी होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला अगदी सहजपणे १२० पेक्षा अधिक जागांसह बहुमत मिळेल. केवळ एक्झिट पोलने काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवलेला नाही, तर जमिनीवरही तेच दिसत आहे. जनतेला बदल हवा आहे.

– के. रहमान खान (काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री)

07:48 (IST) 13 May 2023
कर्नाटकात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, या ७ बड्या नेत्यांच्या निवडणूक निकालाकडे देशाचं लक्ष

कर्नाटकमधील दिग्गज नेते उभे असलेले ७ मतदारसंघ

१. शिग्गाव – बसवराज बोम्मई बीजेपी – यासिर अहमद खान पठाण काँग्रेस

२. हुबळी धारवाड मध्य – जगदीश शेट्टर काँग्रेस – महेश तेंगीनाकाई भाजपा

३. कनकपुरा – डी. के. शिवकुमार (काँग्रेस) – आर. अशोक (भाजपा)

४. चन्नापट्टन – एच. डी. कुमारस्वामी जेडीएस – सी. पी. योगेश्वर भाजपा

५. चित्तपूर – प्रियांक खरगे काँग्रेस – मणिकंता राठोड भाजपा

६. अथणी – लक्ष्मण सवदी काँग्रेस – महेश कुमथल्ली भाजपा – शशिकांत पडसलगी जेडीएस

७. वरुणा – सिद्धरामय्या काँग्रेस – व्ही सोमन्ना भाजप

07:44 (IST) 13 May 2023
बेळगावमधील ‘या’ ७ मतदारसंघातील निकालावर महाराष्ट्राचं लक्ष

बेळगावमधील ७ महत्त्वाचं मतदारसंघ

१. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर

२. बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर समिती – अभय पाटील भाजप

३. बेळगाव उत्तर – आसिफ उर्फ राजू शेठ काँग्रेस – रवी पाटील भाजप – अमर येळ्ळूरकर समिती

४. बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेस – नागेश मन्नोळकर भाजप – आर. एम. चौगुले समिती

५. निपाणी – शशिकला जोल्ले भाजप – काकासाहेब पाटील काँग्रेस – उत्तम पाटील राष्ट्रवादी – जयराम मिरजकर समिती

६. यमकनर्डी – सतीश जारकोहोळ काँग्रेस – बसवराज हुंदरी भाजप – मारुती नाईक समिती

७. खानापूर – अंजली निंबाळकर काँग्रेस – विठ्ठल हलगेकर भाजप – मुरलीधर पाटील समिती

07:38 (IST) 13 May 2023
कर्नाटकात कोणाची सत्ता येईल? एक्झिट पोलचे अंदाज धुडकावत बसवराज बोम्मई म्हणतात, “वाढलेल्या मतदारांमुळे…”

महिनाभराच्या धामघधुमीनंतर अखेर कर्नाटकात काल (१० मे) मतदान प्रक्रिया पार पडली. तिथे ७२ टक्के मतदान झाले असून हे आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान असल्याचं बोललं जातंय. मतदानानंतर एक्झिट पोलचेही अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आमचीच (भाजपाची) सत्ता सत्तेवर राहिल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलचे अंदाज बसवराज बोम्मई यांनी फेटाळून लावला आहे.

सविस्तर वाचा…

07:36 (IST) 13 May 2023
कर्नाटकमधील जनतेला भाजपा सरकारचा कंटाळा आलाय, काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

काँग्रेस पुन्हा एकदा बहुमताचं सरकार स्थापन करेल. आम्हाला याचा आत्मविश्वास आहे. कर्नाटकमधील जनतेला बदल पाहायचा आहे. त्यांना भाजपा सरकारचा कंटाळा आला आहे.

– सलीम अहमद (काँग्रेस नेते)

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) झाली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा…