Karnataka Vidhan Sabha Election Results 2023, 13 May 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी झालेल्या विधानसभेच्या २२४ मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) पार पडली. यात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवलं आणि भाजपाचा दारूण पराभव केला. यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…

Live Updates

Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…

07:28 (IST) 13 May 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था, सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार, बंगळुरूत माऊंट कॅरमल महाविद्यालय आणि सेंट जोसेफ महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रातही तयारीची लगबग सुरू

07:16 (IST) 13 May 2023
कर्नाटकमध्ये २ हजार ६१५ उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल

सकाळी ८ वाजता २२४ जागांसाठी मतमोजणी होणार, २ हजार ६१५ उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल

07:02 (IST) 13 May 2023
आम्ही आमचं काम केलं, आता निकालाची वाट पाहू – डी. के. शिवकुमार

आम्ही आमचं काम केलं, आता निकालाची वाट पाहू, कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचं वक्तव्य, बंगळुरूमध्ये पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक, निकालानंतर आमदारांना रिसॉर्टवर ठेवणार का? या प्रश्नाचं उत्तर टाळलं

06:55 (IST) 13 May 2023
सकाळी ८ वाजता राज्यभरात ३६ केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार

राज्यात विक्रमी ७३.१९ टक्के मतदान झाले. नवमतदारांबरोबरच ज्येष्ठ मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. सकाळी ८ वाजता राज्यभरात ३६ केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. साधारणत: दुपापर्यंत मतदारांनी कोणाला कौल दिला आहे त्याचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यत: सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यामध्ये लढत झाली. मात्र चुरस भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच होती. राष्ट्रवादी काँग्रेस, दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्याशिवाय महाराष्ट्राचे लक्ष सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामगिरीकडे असेल.

06:49 (IST) 13 May 2023
Karnatak Election Exit Polls : भाजपा, काँग्रेस की जेडीएस? कर्नाटकमध्ये कोण मारणार बाजी? कोणाला किती जागा? पाहा एक्झिट पोल…

Karnatak Election 2023 Exit Polls Updates : कर्नाटकमध्ये आज (१० मे ) विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. आता कर्नाटकमध्ये भाजपा किंवा काँग्रेसची एकहाती सत्ता येणार की जेडीएस किंगमेकर ठरणार? हे १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी अनेक जनमत कल (एक्झिट पोल) जाहीर होत आहेत. या जनमत चाचणीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसला किती जागा मिळेल यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

06:48 (IST) 13 May 2023
कर्नाटकच्या निकालाकडे लक्ष, भाजप की काँग्रेस? आज मतमोजणी

पीटीआय, बंगळूरु : Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज, शनिवारी होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे असले तरी ते खरे ठरतात की मतदार दुसऱ्यांदा भाजपलाच संधी देऊन सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची राज्यातली ३८ वर्षे जुनी परंपरा खंडीत करतात, याबद्दल उत्सुकता आहे.

सविस्तर वाचा…

06:48 (IST) 13 May 2023
कर्नाटकमध्ये ७२ टक्के मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या २२४ जागांसाठी पार पडलेल्या मतदानात रामनगर येथे सर्वाधिक ७८.२२ टक्के मतदान झाले होते. बंगळूरु शहरमध्ये ४८.६३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील  विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात एकूण ७२.३६ टक्के मतदान झाले होते.

सविस्तर वाचा…

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (१३ मे) झाली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा…