Karnataka Elections : कर्नाटकात मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी राजकीय गरमागरमी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी कर्नाटक येथील सभेत काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसने ९१ वेळा मला शिवीगाळ केली, असा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे आमदार प्रियंक खरगे यांनी सोमवारी प्रचार सभेदरम्यान (दि. १ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नालायक’ असा केला. खरगे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असताना सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात प्रियंक खरगे हे मंत्री म्हणून काम करत होते. कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर या विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत.

प्रियंक खरगे यांनी प्रचार सभेत भाषण करत असताना भाजपाच्या आरक्षण धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, “तुम्ही (मोदी) जेव्हा गुलबर्गा येथे आला होतात, तेव्हा तुम्ही बंजारा समाजाला काय आश्वासन दिले? ‘बंजारा समाजाने घाबरू नये, त्यांचा एक मुलगा दिल्ली येथे बसला आहे,’ असे वक्तव्य गुलबर्गा येथील भाषणात केले. पण जर असला नालायक मुलगा दिल्लीत बसलेला असेल तर कसे होईल? घर कसे चालेल?” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारी रोजी गुलबर्गा येथे केलेल्या भाषणाचा उल्लेख करून प्रियंक खरगे यांनी ही टीका केली. बोम्मई सरकारने मागच्या महिन्यात आरक्षणात फेरफार केल्यामुळे बंजारा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप खरगे यांनी केला.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

हे वाचा >> कर्नाटकातील अर्ध्याहून अधिक जागांवर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षाही जास्त!

खरगे म्हणाले, “पंतप्रधान स्वतःला बंजारा समाजाचा पुत्र म्हणवून घेत आरक्षणाच्या प्रश्नावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंजारा समाजावर अन्याय झाला नाही का? मग भाजपाचे नेते बीएस येडियुरप्पा यांच्या शिकारीपुरा (शिवमोगा जिल्हा) येथील घरावर दगडफेक का झाली? कलबुर्गी आणि जेवार्गी या ठिकाणी बंद का पाळण्यात आला?” आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपाने खूप गोंधळ घातलेला आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला मत द्यावे, तरच या विषयासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली जाईल, असे आवाहनदेखील खरगे यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोळी, कब्बलिगा आणि कुरुबा समाजांचेही सुपुत्र असल्याचा दावा मागच्या काही दिवसांतील दौऱ्यात केलेला आहे, अशीही आठवण खरगे यांनी करून दिली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात बदल केलेले आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाची मर्यादा १५ टक्क्यांवरून १७ टक्के करण्यात आली होती. मात्र अनुसूचित जातींतर्गत असलेल्या आरक्षण कोट्याची विभागणीही केली. अनुसूचित जातीमधील डाव्या यादीतील जातींना सहा टक्के आरक्षण देण्यात आले, तर उजव्या यादीतील जातींना ५.५ टक्के एवढे आरक्षण देण्यात आले. उर्वरित आरक्षण अनुसूचित जातीत मोडणाऱ्या इतर जातींना देण्यात आले. भाजपा सरकारच्या या निर्णयाविरोधात अनुसूचित जातीच्या उजव्या यादीतील जातींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. उजव्या यादीमध्ये बंजारा समाजही मोडतो. (कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीमध्ये डावी आणि उजवी अशी जातींची विभागणी करणारी यादी करून त्यांना कोट्यांतर्गत कोटा देण्यात आला आहे.)

हे ही वाचा >> समान नागरी कायदा, ‘एनआरसी’चे भाजपचे आश्वासन; कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा

प्रियंक खरगे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सदर व्हिडीओ ट्वीट केला. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले, “प्रियंक हे मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र नसते तर ते काय असते? कुणी अंदाज बांधू शकता? लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांना नालायक म्हणणे हे बापाच्या जिवावर जगणाऱ्या मुलालाच शोभते. तुमचे पंतप्रधानांशी मतभेद असू शकतात, हे मान्य. त्यांच्यावर टीका करा. पण अशी खालच्या पातळीची टीका करणे योग्य नाही. ज्युनिअर खरगेंनी स्वतःचा मतदारसंघ वाचविण्याचा प्रयत्न करावा; आपल्या वजनापेक्षा अधिक भार उचलू नये.”

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीदेखील याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीने त्यांनी (प्रियंक) स्वतःची मर्यादा ओलांडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी स्वतःचेच शब्द मागे घेतले होते. आता मुलाची पाळी आली आहे. लोक तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.” मुख्यमंत्री बोम्मई यांच्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री शोभा करंदालजे यांनी निवडणूक आयोगाकडे प्रियंक खरगे यांची तक्रार केली.

आणखी वाचा >> “…तर मला विषारी साप बनणं मंजूर”, पंतप्रधान मोदी यांचं विधान!

दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र आपल्या मुलाची बाजू सावरून धरली आहे. ते म्हणाले, “हे पूर्ण चुकीचे आहे. प्रियंकने असे कधीच म्हटलेले नाही. त्याच्या तोंडी तुम्ही चुकीचे शब्द घालू नका. त्याने फक्त त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. (मोदी नाही). त्यामुळे मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य त्याच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करू नका. जाणीवपूर्वक हे वक्तव्य सगळीकडे पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.” मागच्याच आठवड्यात खरगे यांनी मोदींना ‘विषारी साप’ म्हटले होते.

Story img Loader