अंकोला (कर्नाटक) : काँग्रेसमध्ये ‘शिवराळ संस्कृती’ असून कर्नाटकच्या जनतेने त्यांना धडा शिकविण्यासाठी मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार तोफ डागली.
‘मी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यंत्रणा मोडित काढल्यामुळे त्या पक्षाचे नेते माझा तिरस्कार करतात आणि माझ्याबाबत अपशब्द वापरतात. काँग्रेस निवडणुकीत एकतर त्यांच्या निवृत्त होत असलेल्या नेत्यांच्या नावे मते मागते किंवा दुसरा मार्ग म्हणजे मोदींना शिव्या दिल्या जातात. कर्नाटकातील जनता ही शिवराळ संस्कृती खपवून घेईल का, कर्नाटकची जनता अपशब्द वापरणाऱ्यांना माफ करेल का, आता तुम्ही काय कराल, तुम्ही त्यांना शिक्षा कराल का, तुम्ही जेव्हा मतदानकक्षात जाल, तेव्हा यंत्रावरील बटण दाबताना जय बजरंगबली म्हणा आणि त्यांना शिक्षा करा,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी मतदारांना आवाहन केले आहे.
काँग्रेसचे संपूर्ण राजकारण हे फोडा आणि राज्य करा याच धोरणावर अवलंबून असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलकी येथील प्रचारसभेत केली. भारताच्या लोकशाहीबाबत जगभरात कौतुकाने आणि आदराने बोलले जाते. मात्र काँग्रेस पक्ष देशाला बदनाम करत फिरत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
‘हनुमान चालिसा’ पठणाचे कार्यक्रम करण्याचा बजरंग दलाचा निर्णय
काँग्रसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर, संपूर्ण राज्यभरात गुरुवारी ‘हनुमान चालिसा’ पठणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे या संघटनेने जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसने हे आश्वासन मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी दिले असल्याचे कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या गैरव्यवहारावर पंतप्रधानांचे मौन- प्रियंका गांधी
सर्वशक्तीमान अशा पंतप्रधानांना कर्नाटकमधील भाजप सरकारमधील भ्रष्टाचार दिसत नाही काय? असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी येथील प्रचारसभेत लगावला. तुम्ही कर्नाटकचा विकास करू म्हणता, मात्र तुमच्याच सरकारने लूट केली. त्यामुळेच चाळीस टक्के कमिशन सरकार अशी या सरकारची ओळख असल्याची टीका प्रियंका यांनी केली. कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही पंतप्रधानांनी मौन बाळगल्याचा आरोप प्रियंका यांनी केला. गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून अनेक कंपन्या दुसरीकडे गेल्याचा दावा प्रियंका यांनी केला.