Kasba Peth Assembly Election 2024 Result : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली होती. सर्वच राजकीय पक्षांकडून कामाचा आढावा घेतला जात होता. खरं तर २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. याचं कारण म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. दरम्यान, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ (Kasba Constituenc) राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे निवडणुकीनंतर स्पष्ट झालं. सध्या कसबा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

kasba peth assembly elections 2024
‘कसब्या’त पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Kothrud Assembly Constituency
Kothrud Assembly Constituency Election 2024 : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांची पुन्हा बाजी; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या जागी लेकाला उमेदवारी!

हेही वाचा : भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

खरं तर कसबा पेठ हा भाजपाचा (BJP) बालेकिल्ला मनला जातो. २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व राहिले. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या मैदानाता होते. त्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळवला होता.

आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात विधानसभेची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. मात्र, अखेर कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा दारूण पराभव झाला तर त्यांच्या विरोधातील भाजपाचे हेमंत रासने मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

२०१९ च्या मतदारांची संख्या

कसबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार, एकूण २,९०,४८४ पात्र मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १,४४,०३४ तर महिला मतदारांची संख्या १,४६,४४६ एवढी आहे. आता या आकडेवारीत बदल झालेला असू शकतो.

कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद

पुणे शहरात सर्वाधिक मतदानाची नोंद करण्याचा विक्रम कसबा विधानसभा मतदारसंघाने नोंदविला असला, तरी वाढलेला मतटक्का उमेदवारांची धडधड वाढविणारा ठरला आहे.पाच वर्षांपूर्वी झालेली निवडणूक, तसेच दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीचा विचार करता तब्बल १० टक्क्यांनी वाढलेले मतदान आपल्यालाच विजयपथावर नेईल, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार तसेच अपक्ष असलेल्या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर किती मतांची बेगमी करतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात यंदा ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत तब्बल दहा टक्क्यांनी, तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे.

Story img Loader