Telangana Assembly election 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाने चांगलीच मुसंडी मारलेली दिसते. काँग्रेसचा प्रभाव बोथट करण्यासाठी सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे तेलंगणाच्या प्रादेशिक भावनांना हात घालत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केसीआर यांनी सरकारच्या कल्याणकारी योजना आणि राज्यात केलेल्या विकासकामांचा उल्लेख प्रचारात केला होता. मात्र, यावेळच्या निवडणुकीत रणनीती बदलली असल्याचे दिसते. कर्नाटकात मोठा विजय संपादित केल्यानंतर काँग्रेसने तेलंगणातही आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

तेलंगणा हे वेगळे राज्य व्हावे, यासाठी केसीआर यांनी आंदोलन उभारले होते. २ जून २०१४ रोजी वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सलग दोनदा त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. यावेळच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यानंतर राज्यभरात ४१ जाहीर सभा घेऊन त्यांनी प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे केला. महबूबनगर जिल्ह्यातील पलामूरू या ठिकाणी त्यांनी पहिली सभा घेतली. या सभेत त्यांनी वेगळ्या राज्यासाठी उभारलेल्या आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यावेळी त्यांनी लोकांचे हाल पाहिले होते, अशी आठवणही सांगितली. “आज आपण पलामूरूचा चेहरामोहरा बदलला असून पलामूरू विकासाची खाण झाले आहे, काँग्रेसवर विश्वास ठेवू नका. काँग्रेस सत्तेत आल्यास तेलंगणा राज्याला संकटांना सामोरे जावे लागेल”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

वेगळ्या तेलंगणा राज्यासाठी केलेल्या आंदोलनाची आठवण

तेलंगणा राज्य अनेक लोकांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे आणि लोकांनी तेलंगणासाठी आमरण उपोषण केले, अशीही आठवण केसीआर यांनी करून दिली. तेलंगणाचे विचारवंत के. जयशंकर यांची आठवण करून देताना केसीआर म्हणाले, प्राध्यापक के. जयशंकर यांच्या सांगण्यावरूनच आपण महबूबनगर मतदारसंघातून निवडणूक लढविली. “महबूबनगर जिल्ह्यात दुष्काळ आणि उपासमार होती. जिल्ह्याचे हे चित्र आम्हाला पाहवत नव्हते. या ठिकाणी कृष्णा नदी वाहत असूनही आंध्रप्रदेशच्या नेत्यांनी शक्कल लढवून इथे विकासाची गंगा पोहचू दिली नाही. कोणताही विकास न करता फक्त भूमिपूजन केले गेले”, अशा शब्दात केसीआर यांनी पलामूरू जिल्ह्यातील लिफ्ट योजनेबाबत माहिती दिली.

पलामूरू आणि त्यानंतर झालेल्या जवळपास चार बैठकांमध्ये केसीआर यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास राज्याचे कसे नुकसान होईल, हेच समजावून देण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्व सभांमध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याच्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देण्यात आली. काँग्रेस सत्तेत आल्यास तुम्हाला वीज मिळणार नाही. रायथु बंधू आणि दलित बंधू यांना वाळीत टाकले जाईल, असे भावनिक आवाहन केसीआर यांनी एका सभेत केले.

राहुल गांधी यांच्या प्रचाराची नक्कल

राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे ढाब्यावर थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधला, त्याप्रमाणे केसीआर यांनीही सिद्दीपेट येथे रस्त्यालगतच्या ढाब्यावर थांबून चहाचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले, तेलंगणा जर विकासाचे मॉडेल असेल, सिद्दीपेट त्याचे नेतृत्व करते. याच सिद्दीपेट जिल्ह्यात पूर्वी पाणी, रस्ते नव्हते. पिकही व्यवस्थित येत नव्हते. आंध्रच्या राज्यकर्त्यांना बाजूला सारून तेलंगणाला आपण स्वतंत्र करत नाही तोपर्यंत सिद्दीपेटला न्याय मिळणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आणि त्याप्रमाणे काम केले.

केसीआर यांनी आठवण करून दिली की, ज्या लोकांनी आंध्रचे विभाजन करून तेलंगणाच्या निर्मितीसाठी विरोध केला, त्याच लोकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून माझ्या पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचाच शेवटी पराभव झाला आणि त्यांना राज्यातून काढता पाय घ्यावा लागला. तेलंगणा चळवळीची मुहूर्तमेठ सिद्दीपेटने रोवली, हे मी कधीही विसरणार नाही.

बीआरएसचा राजकीय वारसदार, स्वतःच्या मुलाचाही प्रचार

सिरसिल्ला जिल्ह्यातून केसीआर यांचे सुपुत्र आणि राजकीय वारसदार समजले जाणारे राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव हे निवडणूक लढवत आहेत. केसीआर या ठिकाणी झालेल्या सभेत म्हणाले की, तेलंगणा चळवळीच्या दरम्यान त्यांनी किमान १७० वेळा या जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यानंतर नेता म्हणून ते पुढे आले. सिरसिल्ला जिल्ह्यात माझे नातलग, मित्रपरिवार आणि अनेक वर्गमित्र आहेत. ते म्हणाले की, जिल्ह्यातील मनेयर जलाशय आंध्र प्रदेशच्या सत्ताधाऱ्यांमुळे खराब झाले, राईस मिल बंद झाल्या. आमच्या काळात अप्पर मनेयर जलाशय पूर्णपणे भरले आहे, याचा मला आनंद वाटतो.

मंत्री के. टी. रामा राव यांच्यासारखा आमदार सिरसिल्ला जिल्ह्याला मिळाला हे जिल्ह्याचे नशीब आहे. मी जेव्हा खासदार होतो, तेव्हा जिल्ह्यात एकाच दिवसात सात हातमाग कामगारांचा मृत्यू झाला होता. माझ्या पक्षाने ५० लाखांचा निधी देऊन उपाययोजना राबविण्यास सांगितल्या; जेणेकरून पुन्हा कुणाचा मृत्यू होऊ नये. हातमाग मंत्री असताना राव यांनी अनेक सकारात्मक बदल घडविले, अशीही आठवण केसीआर यांनी करून दिली.

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर यांनी लोकांना इशारा देताना सांगतिले की, जर काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर धरणी लँड्स पोर्टलसारखी योजना बंद केली जाईल, ज्यामुळे तेलंगणाला २४ तीस मोफत वीजपुरवठा होत आहे.

बीआरएसची तेलंगणावर पकड किती?

२०१४ (आंध्र प्रदेशचा भाग असताना झालेल्या निवडणुका)

बीआरएसला (तेव्हाचे टीआरएस) – ३४.३ टक्के मतदान, ६३ जागा

काँग्रेस – २५.२ टक्के मतदान, २१ जागा

भाजपा – ७.१ टक्के मतदान, ५ जागा

२०१८ च्या विधानसभा निवडणुका

बीआरएसला (तेव्हाचे टीआरएस) – ४६.९ टक्के मतदान, ११९ पैकी ८८ जागा

काँग्रेस – २८.४ टक्के मतदान, १९ जागा

भाजपा – ६.९८ टक्के मतदान, १ जागा

२०१९ लोकसभा निवडणुका

बीआरएसला (तेव्हाचे टीआरएस) – ४१.७१ टक्के मतदान, १७ पैकी ९ जागा

काँग्रेस – २९.७९ टक्के मतदान, ३ जागा

भाजपा – १९.६५ टक्के मतदान, ४ जागा

Story img Loader