Kirit Somaiya : महाराष्ट्रात ५ डिसेंबर २०२४ हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण याच दिवशी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती शनिवारी बिघडली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. तिथे त्यांनी शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. चाचण्या करून झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान किरीट सोमय्यांनी ( Kirit Somaiya ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे.

हे पण वाचा- Chhagan Bhujbal : महायुतीत मंत्रि‍पदावरून रस्सीखेच? ‘शिंदेंच्या शिवसेनेएवढी मंत्रि‍पदे आम्हाला द्या’, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी मागणी

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. अडचणी येत आहेत तरीही ते धडपड करत आहेत की लवकरच महायुतीचं सरकार स्थापन व्हावं. त्यामुळे त्यांच्या शरीरावर अधिक ताण येतो आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी अशी आमची सगळ्यांचीच प्रार्थना आहे. लवकरच एकनाथ शिंदे पुन्हा मैदानात येतील अशी आमची अपेक्षा आहे.” असं किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) म्हणाले.

विरोधकांना बोलायला जागाच उरली नाही

b

निवडणुकीच्या प्रचारामुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण आला होता. पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली. मात्र त्यांची प्रकृती लवकरच बरी होईल अशी मला अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने इतकं मोठं जनमत दिलं आहे विरोधकांना बोलायला जागा उरलेली नाही. त्यामुळे सध्या विरोधकांकडे दुर्लक्ष करा, त्यांना बोलायचं ते बोलू द्या असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तसंच विरोधकांनाही बोलवण्यात आलं आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आजारी आहेत याचे वेगळे अर्थ कुणीही काढू नयेत ते इतका ताण असताना लवकर सरकार स्थापन व्हावं म्हणून प्रयत्न करत आहेत असंही किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya imp statement about eknath shinde what did he say scj