Kothrud Assembly Constituency Election 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली. अनेक नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले असून कामाचा आढावा घेतला होता. खरं तर ही विधानसभेची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातही ((Kothrud Constituenc)) घडामोडी वाढल्या आहेत. या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे विद्यमान आमदार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलाचा परिणाम स्थानिक राजकारणात देखील पाहायला मिळत मिळत आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही विधानसभेची निवडणूक (Election) प्रतिष्ठेची मानली जाते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा (Kothrud Assembly Constituency) मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) की महायुतीला? की इतर कोणत्या पक्षाला? तसेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पुन्हा एकदा बाजी मारणार का? या सर्व प्रश्नांचं उत्तर आता निकालानंतर मिळणार आहे.

हेही वाचा : Pimpri Assembly Constituency : पिंपरीकर कोणाला कौल देणार, मविआ की महायुती? कसं आहे विधानसभेचं गणित?

चंद्रकांत पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले. खरं तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढवल्यामुळे स्थानिक उमेदवार आणि आयात उमेदवार या मुद्द्याभोवती ती निवडणूक फिरली होती. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे तेव्हा भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांना पाच वर्षे झाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोथरूडकर त्यांना स्वीकारतील का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.

२००८ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून कोथरूड हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले होते. तसेच पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मेधा कुलकर्णी या निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला होता. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज झाल्याचंही बोललं जात होतं. मात्र, पुढे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं.

हेही वाचा : Chinchwad Assembly Constituency : चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार; भाजपाच्या गडाला मविआ सुरुंग लावणार का? कसं आहे राजकीय गणित?

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे (MNS) किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत (Mahayuti) विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याच्या फॉर्म्युल्यानुसार कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली. दुसरीकडे कोथरूडमधून मनसेने देखील उमेदवार दिला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोण बाजी मारतं? हे निकालानंतर समोर येणार असून निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

२०१९ च्या मतदारांची संख्या

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना १०५२४६ एवढे मतदान मिळाले होते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाचे ७९७५१ एवढे मतदान मिळाले होते.२०१९ च्या आकडेवारीनुसार कोथरूडमध्ये पुरुष मतदारांची संख्या १,८१,८३४ तर महिला तदारांची संख्या १,६७,०१२ होती तर एकूण मतदार ३,४८,८४६ एवढे होते.

कोथरुडमध्ये २०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान झालं. तर कोथरुड मतदारसंघात (Kothrud Constituenc) २०१९ मध्ये झालेल्या ४८.२० टक्क्यांच्या तुलनेत यावेळी ५२.१८ टक्के मतदान नोंदवले गेले.